Ponniyin Selvan Collection: दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 114 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं तमिळनाडुमध्ये जवळपास 22 कोटींचे कलेक्शन केले. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...


भारतातील कलेक्शन 
शुक्रवारी (30 सप्टेंबर) या चित्रपटानं 39 कोटींचे कलेक्शन केले. तर शनिवारी (1 ऑगस्ट) या चित्रपटानं 36 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच या चित्रपटानं रविवारी (2 ऑगस्ट) या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं जवळपास 114 कोटींची एकूण कमाई केली आहे.  


जगभरातील कलेक्शन 
'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटानं फक्त भारतीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटानं वीकेंडला जगभारातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 230 कोटींची कमाई केली. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला. 






तगडी स्टार कास्ट 
चित्रपटात विक्रम, जयम रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन या कलाकारांनी 'पोन्नियिन सेल्वन'  या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. 


'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग हा नऊ महिन्यांनी रिलीज केला जाणार आहे, असं म्हटलं जात आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  या चित्रपटाला संगीत ए. आर. रहमान यांनी दिली आहे. 


चित्रपटांचे बजेट 500 कोटी


500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेलवन 1'चा धमाका; दोन दिवसांत जगभरात पार केला 150 कोटींचा आकडा