PM Modi Biopic : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. त्यांचा 'कल्की 2898 एडी' (प्रोजेक्ट के) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. तसेच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
'टॉयलेट : एक प्रेम कथा' आणि 'परी' सारख्या सिनेमांची निर्मिती केलेली प्रेरणा अरोरा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (PM Narendra Modi Biopic) बायोपिक बनवणार आहेत. नरेंद्र मोदी यांचं रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व प्रेरणा यांना आवडल्याने त्यांनी हा बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला अमिताभ बच्चन योग्य न्याय देऊ शकतील यामुळे प्रेरणाने त्यांची निवड केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंचा समावेश असणार आहे. परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा, देशाचा आर्थिक विकास ते कोरोनासारखा आजाराचा केलेला सामना अशा अनेक गोष्टी या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रेरणा म्हणाली की, मोदींपेक्षा मोठा हिरो मी पाहिलेला नाही. मोदींची भूमिका साकारण्यासाठी अमिताभ बच्चन हे सर्वात योग्य अभिनेते आहेत. नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे महामारीचा सामना केला आहे, त्यामुळे ते मार्वलच्या सुपरहिरोपेक्षा मोठे आहेत. विवेक ओबेरॉय यांचा सिनेमा मी पाहिलेला नाही. पण माझा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्याय देणारा असेल".
प्रेरणाने सहा सिनेमांची निर्मिती केल्यानंतर 2018 मध्ये तिचं क्री-अर्ज नावाचं प्रोडक्शन हाऊस बंद केलं. काही कारणांने ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण आता नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित कलाकृती (PM Modi Movies And Web Series)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2019 मध्ये 'मोदी: जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम मोदी’ हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजवर नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
संबंधित बातम्या