Parineeti Raghav Wedding:  बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha)  यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी  उदयपूरमध्ये  पार पडला. नुकताच परिणीतीनं तिच्या लग्नसोहळ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वरात, नवरीची एन्ट्री, पाहुण्यांची लगबग या गोष्टी दिसत आहेत. व्हिडीओला परिणीतीनं खास कॅप्शन देखील दिलं आहे.


परिणीतीनं शेअर केलेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला राघव चड्ढा आणि लग्नसोहळ्यात आलेले पाहुणे वरातीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्याचबरोबरच परिणीती ही लपून वरात बघत आहे, असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


परिणीतीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची लग्नातील एन्ट्री आणि लग्नसोहळ्यातील काही खास क्षण देखील दिसत आहेत. या व्हिडीओला परिणीतीनं कॅप्शन दिलं, "हे माझ्या पतीसाठी... मी गायलेलं सगळ्यात महत्त्वाचं गाणं. तुझ्याकडे चालत आले, वरात लपून बघितली, हे गाणे गायले. या सर्व गोष्टींबद्दल मी काय बोलू.. ओ पिया, चल चलें आ"


परिणीतीच्या लग्न सोहळ्यातील एन्ट्रीला लावण्यात  'ओ पिया'  हे  आलेले गाणे हे परिणीतीनं स्वत: रेकॉर्ड केले होते.


पाहा व्हिडीओ:






उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. परिणीतीचा लग्नसोहळ्याचा लेहेंगा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. तर राघव चड्ढा यांनी फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेला आऊटफिट परिधान केले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा,  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे  आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.  


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ,"नाश्त्याच्या टेबलावर आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे". 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीतीचं पतीला खास गिफ्ट; लग्नासाठी रेकॉर्ड केलं 'हे' गाणं