Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लग्नामुळे चर्चेत आहेत. आज राघव चड्ढा यांचा वाढदिवस आहे. राघव यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राने खास पोस्ट शेअर केली आहे. 


परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर परिणीती आणि राघव यांची ही पहिली दिवाळी आहे. लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण साजरा करण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत. दिवाळीतच राघव चड्ढा यांचा वाढदिवस आला आहे. 


राघव चड्ढा आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राघव चड्ढा यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा लग्नानंतर फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी क्लिक केलेले रोमँटिक फोटो अभिनेत्रीने आता शेअर केले आहेत. 






परिणीती चोप्राची पोस्ट काय आहे? (Parineeti Chopra Post)


परिणीती चोप्राने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"देवाने मला दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तू आहेस. तुझं मन आणि बुद्धी मला हैराण करते. तुझा प्रामाणिकपणा आणि विश्वास, एक चांगला व्यक्ती म्हणून असलेलं तुझं कर्तृत्व मला प्रेरणा देत आलं आहे. आज अधिकृतरित्या माझा आवडता दिवस आहे. माझ्यासाठी आजचा तुझा जन्म झालेला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा...आणि माझी निवड केल्याबद्दल खूप-खूप आभार". 


परीची रोमँटिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परी एका मेसेजच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. परीची ही पोस्ट चाहत्यांच्याही पसंतीस उतरली आहे. तिच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


परिणीतीच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Parineeti Chopra Movies)


हसी तो फसी, इश्कजादे, शुद्ध देसी रोमान्स, दावत-ए-इश्क यांसारख्या चित्रपटांमध्ये परिणीतीनं काम केलं. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीतीचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 


संबंधित बातम्या


Parineeti Chopra: "पारू, सुपरस्टारप्रमाणे तू ..."; परिणीतीच्या वाढदिवसानिमित्त राघव चड्ढा यांनी शेअर केली खास पोस्ट