Parineeti Chopra Cycling: सध्या दिल्लीत वाढत्या प्रदुषणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. दिल्लीत सध्या प्रदुषणाचा पारा अलार्मिंग पातळीवर गेल्यानं दिल्लीतील १५०० शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पण अशा प्रदुषणात बॉलिवूडची लोकप्रीय अभिनेत्री परिणीती चोप्रा नवऱ्यासोबत सायकलवर चक्कर मारण्यासाठी बाहेर पडल्याचं दिसलं. तिचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसतोय. राष्ट्रपती भवनासमोरून हे दोघे सायकल चालवताना यात दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.
परिणिती राघव चढ्ढानं मारली सायकलवर चक्कर
दिल्लीत सध्या प्रदुषणानं टोक गाठलंय. सध्या दिल्लीत फिरणं म्हणजे दिवसाला एखाद्यानं २० सिगारेट फुंकणं अशा आशयाचे रिपोर्ट येत आहेत. दरम्यान, परदेशातून परत आल्यानंतर परिणीती आणि तिचा नवरा राघव चढ्ढा यांनी मॉर्निंग सायकलींग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दोघानी यात काळे कपडे परिधान केले आहेत. व्हायरल बिर्यानी या चॅनलवरून या दोघांचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.
परिणीतीच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंटचा धूर..
परिणीती चोप्रा सध्या परदेशातून परतल्यानंतर आपल्या पतीसोबत आणि सासरच्या घरी वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच सोशल मीडियावर या दोघांचा सायकल चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यावर सायकलीची आता आठवण झाली का?.. एकानं लिहिलं की हे श्वास कसा घेतायत.. एका चाहत्यानं लिहिलं प्रदुषणामुळं त्यांचे कपडे काळे झालेत का अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत.
लेकजावयासाठी परिणीतीच्या आईच्या चित्राचीही चर्चा
अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं. दरम्यान, परदेशातून परत आल्यानंतर परिणीती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय. नुकताच तिने तिच्या आईनं राघव आणि परिणीतीला दिलेल्या चित्राची चांगलीच चर्चा आहे.आईने दिलेल्या खास भेटवस्तूचा फोटो परिणीती चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रिणीतीच्या या पोस्टवर राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हॅलो रीना चोप्रा…आता आपल्याला सर्वांना कळालंच असेल की परीमध्ये कलेचा किडा कसा आणि कोणाकडून आला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आतापर्यंत दिलेल्या भेटवस्तूंपैकी सर्वात सुंदर भेटवस्तू तुम्ही दिली आहे. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. असं लिहिलं होतं.