Bollywood Trend in 2025 : बॉलिवूडमध्ये अलिकडच्या काळात सीक्वेल आणि फ्रेंचायझीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपट फक्त फ्रेंचायझीवर आधारित आहे. बॉलिवूड निर्माते नवीन चित्रपट आणि कथेवर विश्वास ठेवण्यापेक्षा फ्रेंचायझीमध्ये पैसे लावणं जास्त पसंत करतात. वेगळा चित्रपट आणि कथेवर पैसे लावण्याचा जुगार खेळण्यापेक्षा निर्माते सीक्वेल आणि फ्रेंचायझीवरील चित्रपटांना प्राधान्य देतात. हेच कारण आहे की, बॉलिवूडमध्ये सीक्वेलचा भडिमार पाहायला मिळत आहे. दिवाळी 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' चित्रपट यांची बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर झाली. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले, तरही दोघांनी जबरदस्त कमाई केली. आता 2025 मध्ये देखील सीक्वेल आणि फ्रेंचायझीचा भडिमार पाहायला मिळणार आहे.
2025 मध्ये 'या' चित्रपटांचे सीक्वेल येणार
येत्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये अनेक हिट बॉलिवूड चित्रपटांची सीक्वेल आणि अनेक फ्रेंचायझीचे चित्रपट येत आहेत. या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या हिट चित्रपटांच्या सीक्वेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. बॉलिवूड प्रेमींसाठी पुढचे वर्ष ब्लॉकबस्टर सीक्वेल आणि फ्रेचायझींनी भरलेले असणार आहे. 2025 मध्ये बागी 4, रेड 2, जॉली एलएलबी 3, हाऊसफुल 5, वॉर 2 आणि वेलकम टू द जंगल यांसारख्या बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
'या' चित्रपटांची वाट पाहत आहेत प्रेक्षक
दिर्ग्दशक रोहित शेट्टीने गोलमाल 5 ची घोषणा केली आहे. फक्त कॉमेडी आणि ॲक्शन चित्रपटच नाही तर कल्ट क्लासिक 'मासूम'चाही रिमेक होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी अलीकडेच त्यांच्या 1983 च्या हिट 'मासूम' चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे ज्यात शबाना आझमी आणि नसीरुद्दीन त्यांच्या भूमिका पुन्हा साकारणार आहेत. सुभाष घई यांनी 'ऐतराज' चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली आहे. याशिवाय अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल यांच्यासोबत भागम भाग या 2006 साली आलेल्या हिट कॉमेडी चित्रपटाचाही सीक्वेल बनवण्याची योजना असल्याच्या अफवा आहेत, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
निर्मात्यांना सीक्वेलचा अधिक फायदा
कोरोनानंतरच्या काळात बॉलिवूड चित्रपटांचा व्यवसाय कमी झाला होता. कोरोनाकाळात झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी निर्मात्यांनी सीक्वेल आणि अनेक फ्रेंचायझीवर जास्त विश्वास दाखवला. जेव्हा चित्रपटाचा व्यवसाय कमी होताना दिसतो, तेव्हा निर्माते सीक्वेल आणि फ्रेंचायझीचा प्लॅन वापरतात. चित्रपट निर्माते जास्त करुन सीक्वेल आणि फ्रँचायझींवर अवलंबून आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना सीक्वेल आणि फ्रेंचायझीचे चित्रपट पाहण्यात रस आहे. प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर ओळखीची पात्रे पुन्हा नव्या शैलीत दाखवणं निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं चित्र आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :