Salman Khan, Palak Tiwari : सलमान खानच्या (Salman Khan) आगामी 'कभी ईद, कभी दिवाली' या चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' असे करण्यात आले आहे. 'भाईजान' चित्रपट रिलीज आधीच प्रचंड चर्चेत आहे. आधी नाव बदलल्यामुळे, तर आता या चित्रपटात अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या (Palak Tiwari) एन्ट्रीची बातमी समोर आल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक 'कभी ईद कभी दिवाळी' वरून 'भाईजान' असे बदलले आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.


श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिची सलमान खानच्या 'भाईजान' चित्रपटात एन्ट्री झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे. श्वेता तिवारीच्या फॅन फॉलोइंगची यादी तशी मोठी आहे. यामुळेच आजकाल पलक तिवारी सर्वत्र चर्चेत आहे. पलक तिच्या आईप्रमाणे इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.



स्वतः सलमान खानने केली निवड


रिपोर्टनुसार, सलमान खानने स्वतः या चित्रपटासाठी पलक तिवारीची निवड केली आहे. पलक या चित्रपटात जस्सी गिलच्या बरोबर दिसणार असून, दोघांचा चित्रपटात खास ट्रॅक असणार आहे. मात्र, या वृत्तांवर पलक तिवारीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.


सलमान खानच्या या चित्रपटात केवळ हिंदीच नाही, तर पंजाब आणि दक्षिणेतील स्टार्सही दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, राघव जुयाल, तेलुगू कलाकार व्यंकटेश दग्गुबाती, जस्सी गिल, शहनाज गिल दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. हा चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.


सलमान खानने केले पलकचे कौतुक


सलमान खानला मनोरंजन विश्वात 'गॉडफादर' म्हटले जाते आणि सलमान खानने यापूर्वीही पलकचे कौतुक केले आहे. पलक तिवारी 'बिग बॉस 15' च्या एका एपिसोडमध्ये दिसली होती. यावेळी सलमान खानने पलकचे तोंडभरून कौतुक केले. इतकेच नाही, तर सलमानने पलकसोबत तिच्या 'बिजली बिजली' गाण्याची हुक स्टेपही केली होती. पलकने सलमान खानच्या 'अंतिम : द फायनल ट्रुथ' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.


हेही वाचा :


Palak Tiwari : 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


Palak Tiwari : भिक मागणाऱ्या महिलेला पैसे न दिल्यानं पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान ट्रोल


Palak Tiwari : 'या' कारणामुळे पलक तिवारी पुन्हा ट्रोल..