पाकिस्तानी कलाकार असलेले ऐ दिल है मुश्किल आणि रईस हे सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
ऐ दिल है मुश्किल या सिनेमाची निर्मिती करण जोहरने केली असून, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
तर शाहरुख खानचा रईस सिनेमात माहिरा खान ही पाकिस्तानी अभिनेत्री झळकणार आहे. त्यामुळे त्याला 'मनचिसे'ने विरोध केला आहे.
"पाकिस्तानी कलाकार मार खातीलच, पण त्या कलाकारांना घेऊन सिनेमे निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शक, निर्मात्यांनाही चोपून काढू", अशी धमकी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला.