Actress Connection With Dawood Ibrahim: बॉलिवूड (Bollywood) आणि अंडरवर्ल्ड (Underworld Don) हे समीकरण आपण अनेकदा ऐकलंय. बॉलिवूडकरांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बाबा सिद्दिकी यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि पुन्हा एकदा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींना अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना तर अंडरवर्ल्डसोबतची मैत्री महागात पडली. काही सेलिब्रिटी तर असे होते की, त्यांची ना मैत्री होती ना कोणतेही संबंध, पण तरीसुद्धा त्यांच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. 


आज अशाच एका सेलिब्रिटीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जिला निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे त्या निर्मात्याला आपला जीव गमवावा लागला होता. अनिता अयुब असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ही अभिनेत्री मुळची पाकिस्तानी. पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती मॉडेलिंग करण्यासाठी भारतात आली होती. इथे अनेक जाहिराती आणि मॉडेलिंग केल्यानंतर अनितानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. देव आनंद यांच्या प्यार का तराना या चित्रपटातून तिनं पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामही केलं. अनितानं देव आनंद यांच्यासोबत गँगस्टरमध्येही काम केलं होतं. याचदरम्यान दाऊद इब्राहिमसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 


दाऊदसोबत प्रेमसंबंध 


अनिता अयुब आणि दाऊद दोघांच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा सुरू झालेल्या. पण, अनितानं दाऊदसोबतचं नातं कधीच मान्य केलं नाही. जेव्हा जेव्हा तिला या नात्याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा तेव्हा अनितानं या चर्चा फेटाळून लावल्या. अनिताचं बॉलिवूड करिअरही फारसं खास नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  एक लोकप्रिय निर्माते जावेद सिद्दीकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दाऊदनं त्यांची हत्या केली होती.


पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या चर्चा 


अनिता आयुब तिच्या चित्रपटांपेक्षाही दाऊदसोबतच्या अफेअरमुळे जास्त गाजलेली. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. एका पाकिस्तानी मासिकात यासंदर्भातील काही गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, लोकांना वाटतंय की, अनिता पाकिस्तानची गुप्तहेर आहे. त्यामुळेच तिच्यावर बॉलिवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला आहे. पण, बराच काळ या गोष्टी सुरूच होत्या. अखेर एक दिवस अभिनय सोडून अनितानं आपल्या मायदेशी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vivek Oberoi Viral Video : विवेक ओबेरॉयची बिश्नोई समाजावर स्तुतीसुमनं; सिद्दिकींच्या हत्येनंतर 'तो' VIDEO Viral, नेटकरी म्हणाले, "सलमान खान का सबसे बडा दुश्मन"