Movie Web Series Online Leak : आजच्या दिवशी  ओटीटीवर बहुप्रतिक्षीत वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपट रिलीज झाले आहेत. मात्र, ओटीटीवरील रिलीजच्या काही तासांमध्येच निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. ओटीटीवर रिलीज झालेला चित्रपट आणि वेब सीरिज ऑनलाईन लीक झाले आहेत. आज, बहुप्रतिक्षीत वेब सीरिज पंचायत-3 रिलीज झाली. त्याशिवाय, रणदीप हुड्डाचे दिग्दर्शन असलेला आणि त्याचीच मुख्य भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantra veer savarkar) चित्रपट आजच्या दिवशी ओटीटीवर रिलीज झाले आहेत. मात्र, या दोन्ही कलाकृती ऑनलाईन लीक झाले आहेत. या घटनेने पायरसीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


स्वातंत्र्य वीर सावरकर  एचडी प्रिंटमध्ये झाला लीक


स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले होते. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिकाही त्याने साकारली होती. चित्रपटातील भूमिकेसाठी रणदीपने केलेले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत आले होते. या चित्रपटात रणदीपच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 


स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट आज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. मात्र, रिलीजच्या काही तासांतच हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाईन लीक झाला. आता हा चित्रपट विविध सोशल प्लॅटफॉर्मवर दिसत आहे.






'पंचायत 3'च्या निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्या दिवशी मोठा फटका


 






'पंचायत 3' या सीरिजची प्रेक्षक गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. पण सीरिज रिलीज झाल्या-झाल्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ही सीरिज एचडीमध्ये ऑनलाईन लीक झाली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते कौतुक करत आहेत. 


'पंचायत 3'मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता. रघुबीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक, सुनीता राजवार, पंकज झा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


 इतर संबंधित बातम्या :