OTT Release January 2024 : नववर्षांचं जल्लोषात (New Year 2024) स्वागत करण्यात आलं आहे. 2023 प्रमाणे 2024 मध्येही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ओटीटीवरदेखील घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


अनेक बिग बजेट सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. यात कल्कि 2898 एडी, मेरी क्रिसमस, मैं अटल हूँ आणि फायटर या सिनेमांचा समावेश आहे. तर ओटीटीवर 'इंडियन पोलीस फोर्स', 'किलर सूप', 'कर्मा कॉलिंग' आणि 'द लेजेंड ऑफ हनुमान 3' या वेबसीरिज समावेश आहे. 


इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) 


रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि सुशांत प्रकाश (Sushant Prakash) दिग्दर्शित 'इंडियन पोलीस फोर्स' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. सात भागांची ही अॅक्शन थ्रिलर सीरिज भारतीय पोलीस अधिकाऱ्यांवर आधारित आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. तर श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंह, मुरेश ऋषी आणि ललित परिमू या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


किलर सूप (Killer Soup) 


मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांची 'किलर सूप' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 11 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिषेक चौबे यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नेटफ्लिक्सवर हा सीरिज प्रदर्शित होणार आहे.


कर्मा कॉलिंग (Karmma Calling)


'कर्मा कॉलिंग' ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. एबीसी सीरिज रिवेंजची ही रिमेक आहे. या सीरिजमध्ये रवीना टंडन विश्वास, धोका, ग्लॅमर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहे. इंद्राणी कोठारीच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार आहे. 26 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. 


द लेजेंड ऑफ हनुमान 3 (The Legend of Hanuman 3)


'द लेजेंड ऑफ हनुमान 3' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 12 जानेवारी 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमधील रावणाच्या भूमिकेसाठी शरद केळकरने आवाज दिला आहे. 


संबंधित बातम्या


OTT Release This Week : सनी देओलचा 'गदर 2' ते कंगनाचा 'तेजस'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी