Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही गेल्या काही दिवसांपासून तिचा होणारा पती सिद्धेश चव्हणसोबतचे (Siddhesh Chavan) रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पूजा आणि सिद्धेश हे लवकरच लग्नबंधनात अडकरणार आहेत. अशातच आता पूजानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करताना दिसत आहे.
सिद्धेशनं पूजाला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज!
पूजानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करतो. त्यानंतर पूजाला आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. त्यानंतर सिद्धेश गुडघ्यावर बसून पूजाच्या बोटामध्ये रिंग घालतो. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी देखील होते.
पूजानं व्हिडीओला दिलं खास कॅप्शन
पूजानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मी काही काळासाठी परीकथांवर विश्वास ठेवणे थांबवले, मला वाटू लागले की 'परफेक्ट मुलगा' ही या जगातील सर्वात काल्पनिक गोष्ट आहे. पण नंतर… मी तुला भेटले आणि मी थेट माझ्या स्वत: च्या परीकथेत गेले. तू माझा मिस्टर परफेक्ट आहेस.आज हा व्हिडीओ शेअर करत आहे कारण यात फक्त 2023 हे वर्षच नाही तर या 1:20 मिनिटांमध्ये माझं पूर्ण आयुष्य आहे. मी एक्सायडेट आहे, थ्रिल्ड आहे पण मला काळजी आजिबात नाहीये कारण तू माझ्यासोबत आहे, आय लव्ह यू मिस्टर चव्हाण. थँक्यू युनिवर्स, थँक्यू 2023" पूजानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा सावंतनं सिद्धेशबद्दल बोलताना सांगितलं की, "माझ्या रिअल लाईफ हिरोचं नाव सिद्धेश चव्हाण आहे. आता आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. सिद्धेश आणि माझं अरेंज मॅरेज आहे. एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यापासून लग्न ठरवण्यापर्यंत आम्ही खूप वेळ घेतला. त्यामुळे ते अरेंज कम लव्ह मॅरेज असेल".
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: