OTT Web Series : ओटीटी (OTT) विश्वात विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहेत. चित्रपट पाहण्यापेक्षा वेबसीरिज पाहणारा मोठा वर्ग आहे. कोरोनानंतर घरबसल्या वेबसीरिज पाहायला प्रेक्षकांना आवडतं. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेबसीरिजने सोशल मीडियावरदेखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'दिल्ली क्राईम' (Delhi Crime), सेक्रेड गेम्स (Sacred Games), भौकाल (Bhaukaal), 'द फॅमिली मॅन' (The Family Man), 'मिर्झापूर' (Mirzapur) अशा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेबसीरिज चांगल्याच गाजल्या आहेत. आता प्रेक्षक या सीरिजच्या पुढच्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. या वेबसीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video) आणि जिओ सिनेमावर (Jio Cinema) पाहू शकतात.


दिल्ली क्राईम (Delhi Crime)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन, राजेश तैलंग स्टारर 'दिल्ली क्राईम' ही वेबसीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन आले आहेत. एकूण 12 एपिसोड आहेत. 


सेक्रेड गेम्स (Sacred Games)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजची गोष्ट प्रामाणिक पोलिस अधिकारी सरताज सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सीरिजमध्ये सरताज सिंह यांची भूमिका सैफ अली खानने साकारली आहे. देशातील गँगस्टर गणेश गायतोंडेपासून वाचण्याचा तो प्रयत्न करतो. नवाजुद्दीन सिद्दीकी गँगस्टरच्या भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


जामताडा (Jamrara)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


'जामताडा' या वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ही सीरिज प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अमित सियाल, दिब्येंदु भट्टाचार्य, अक्षा परदासनी, आसिफ खान आणि अंशुमान पुष्कर या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


भौकाल (Bhaukaal)
कुठे पाहू शकता? एमएक्स प्लेअर


'भौकाल' या सीरिजचं प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चांगलच कौतुक केलं होतं. मोहित रैना, अभिमन्यू सिंह, सिद्धांत कपूर, बिदिता बाग, गुल्की जोशी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअरवर पाहता येईल.


द फॅमिली मॅन (The Family Man)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ


'द फॅमिली मॅन' या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी, प्रियामणी, शरद केळकर, शारिब हाशमी, दलीप ताहिल हे कलाकार आहेत. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.


असुर (Asur)
कुठे पाहू शकता? जिओ सिनेमा


'असुर' ही थरार नाट्य असणारी वेबसीरिज आहे. या सीरिजमध्ये अरशद वारसीची टीम एका सीरियल किलरला पकडण्याचा प्रयत्न करते असं दाखवण्यात आलं आहे. जिओ सिनेमावर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


मिर्झापुर (Mirzapur)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ


'मिर्झापुर' या सीरिजने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्वात चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय सीरिजमध्ये 'मिर्झापुर'चा समावेश होतो. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


आश्रम (Aashram)
कुठे पाहू शकता? एमएक्स प्लेअर


बॉबी देओलच्या आश्रम या वेबसीरिजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. एमएक्स प्लेअरवर प्रेक्षक ही गाजलेली सीरिज पाहू शकतात.


संबंधित बातम्या


Monday Motivation : 'मुन्ना भैय्या' फेम दिव्येंदू शर्माचा खडतर प्रवास, 32 रुपये वाचवून पोट भरले, पण हार मानली नाही