Oscars 2024 : 'ऑस्कर 2024' (Oscars 2024) या बहुप्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सिनेमाने बाजी मारली आहे. यंदाचा ऑस्कर विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्यातीत एक गोष्ट म्हणजे ऑस्करच्या रेड कार्पेटवर लोकप्रिय अभिनेत्री वैनेसा हजेंसने (Vanessa Hudgens) चाहत्यांना गुडन्यूज दिली.


वैनेसा हर्जेंस लॉस एंडिल्स येथील ऑस्करच्या रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. म्युझिकल स्टारच्या काळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैनेसा आणि टकर लवकरच आई-बाबा होणार आहेत. डिसेंबर महिन्यात ते लग्नबंधनात अडकले होते. तर 2022 मध्ये त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. 


टकर आणि हजेंस यांच्या एका पोस्टमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती. दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं होतं,"डेट नाईट". या फोटोमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. 






वैनेसा हजेंस आणि कोल टकरचा रोमान्स


टकर आणि हजेंसबद्दलच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"झूम मेडिटेशन ग्रुपमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. 2021 मध्ये 'डू बॅरीमोर शो'च्या दरम्यान आम्ही पहिल्यांदा एकमेकांसोबत बोललो. पुढे आमची चांगली मैत्री झाली आणि आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. टकर माझ्यासाठी योग्य आहे. त्याच्यासोबत असताना मी खूप आनंदी असते". वैनेसा हजेंसच्या बाळाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


'ऑस्कर 2024'मध्ये कोणी बाजी मारली? 


'ऑस्कर 2024'मध्ये 'ओपनहायमर' (Oppenheimer) हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. एमी स्टोन (Emma Stone) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर सिलियन मर्फी (Cillian Murphy) सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. 'ओपनहायमर'चा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनला (Christopher Nolan) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.


ऑस्कर पुरस्काराचं यंदा 96 वं वर्ष होतं. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळा पार पडला आहे. 'ऑस्कर 2024'कडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा पाहता येईल. 


संबंधित बातम्या


Oscars 2024 : ऑस्करमध्ये जगभरातील सिताऱ्यांच्या गर्दीत खुर्चीवर दाबात बसलेला एक कुत्रा भाव खाऊन गेला! तो नेमका कोण?