Oscars 2023 : 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. जगभरातील लोकांचे लक्ष लागले होते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास होता. कारण भारतातील दोन चित्रपटांनी हा पुरस्कार पटकावला. आता ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची कशी निवड केली जाते? हे विजेते मतदान करुन ठरवले जातात का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. जाणून घेऊयात ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या निवड प्रक्रियेबद्दल...


कोण करतं मतदान? 


अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे 10,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे 17 शाखांमध्ये विभागले गेले आहेत. अकादमीच्या सर्व सदस्य हे चित्रपटसृष्टीसोबत निगडीत असणं आवश्यक आहे. मॅनेजर्स, एक्झिक्युटिव्ह आणि पब्लिक रिलेशन या विभागात काम करणाऱ्या लोकांचा देखील समावेश यांमध्ये असतो. हे सदस्य मतदान करतात.


पुरस्काराच्या नामांकनाची नावे मुख्यतः नामांकन कॅटेगिरीच्या संबंधित असणारे सदस्य ठरवतात. उदाहरण, दिग्दर्शन कॅटेगिरीसाठी दिग्दर्शकच मतदान करतो. पण सर्व सदस्य सर्वोत्कृष्ट चित्रपट या श्रेणीसाठी मतदान करु शकतात. नामांकन निश्चित झाल्यानंतर, सर्व सदस्य कोणत्याही विभागात मतदान करु शकतात. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यांमध्ये नव्या सदस्यांचा देखील सहभाग होतो. 


मतदान हे पुरस्कार सोहळ्याच्या काही दिवस आधी होते. ऑस्कर 2023 साठीचे मतदान 2 मार्च रोजी सुरु झाले आणि 7 मार्च रोजी संपले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या सहा दिवस आधी ही प्रक्रिया पूर्ण झाली.


विजेता निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. ज्यामुळे कोणतीही गडबड होऊ शकत नाही. ज्या चित्रपटाला सर्वाधिक मते मिळतात तो चित्रपट विजेता ठरतो. पण सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडण्यासाठी रँकमध्ये मतदान होते. पहिल्या रँकमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवणाऱ्या चित्रपटाला विजेता घोषित केले जाते.  


भारतातील 'या' चित्रपटांनी पटकावला ऑस्कर


ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावला आहे. तर सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार हा भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीने पटकावला.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscars 2023 : ऑस्करने स्वत:चा रेकॉर्ड मोडला; कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा