Oscars 2023 : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) वितरणाचा भव्यदिव्य सोहळा आज लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्करचे यंदाचे 95 वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यंदाचा ऑस्कर सोहळा भारतासाठी खास ठरला आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा कोणत्याही वाद-विवादाशिवाय पार पडला आहे. 


'ऑस्कर 2023'ची सांगता झाल्यानंतर यंदाचा पुरस्कार सोहळा शांततेत पार पडल्याची विशेष नोंद घेण्यात आली आहे. कोणत्याही वादाशिवाय पार पडणारा हा पहिलाच पुरस्कार सोहळा आहे. कोणत्याही वादाविना संपन्न झालेला हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार सोहळा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील थप्पड प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांबद्दल जाणून घ्या...


विलने ख्रिस रॉकला मारली थप्पड!


अभिनेता विल स्मिथने ऑस्कर 2022च्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला जोरदार थप्पड मारली. ख्रिसने स्मिथची पत्नी जाडा पिंकेट-स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली होती. ख्रिसने गमतीने टक्कल पडण्याचा संबंध एका हॉलिवूड चित्रपटाशी जोडला. जाडा आणि विल स्मिथला ही गोष्ट आवडली नाही. अशा स्थितीत विल स्मिथने शोच्या मध्यातच स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला थप्पड लगावली.


सिनेमाची घोषणा करताना चूक झाली अन्...


'2017'चा ऑस्कर पुरस्कार सोहळा चर्चेत आला होता. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यासाठी फेय ड्युनावे आणि वॉर्न बिट्टी यांना मंचावर बोलवण्यात आले. त्यावेळी त्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून लाला लॅंड या सिनेमाची घोषणा केली. पण हा पुरस्कार मूनलाईट या सिनेमाला दिला जाणार होता. त्यामुळे 2017 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. पण नंतर ही चूक सुधारण्यात आली.


अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या


'2023'च्या ऑस्करमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. 'बॉलिंग फॉर कोलंबाइन' या सिनेमासाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मूर स्टेजवर पोहेचले तेव्हा त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या. 


अँजेलिना अडकली वादाच्या भोवऱ्यात 


अँजेलिना 2000 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. अँजेलिना जोलीला गर्ल इंटरप्टेड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार सोहळ्याआधी अँजेलिनाने रेड कार्पेटवर तिच्या भावाला किस केलं होतं आणि याच कारणाने ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.


संबंधित बातम्या


Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने रचला इतिहास; 'नाटू नाटू' गाण्यासह 'The Elephant Whisperers'ने मारली बाजी