Oscar 2023: 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. भारतातील काही कलाकारांना या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं. याआधी देखील काही कलाकारांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आलं. जाणून घेऊया ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल...
भानू अथैया (Bhanu Athaiya)
भानू अथैया हे कॉस्ट्यूम डिझायनर होत्या. त्यांना 1982 मध्ये रिलीज झालेल्या गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाईन कॅटेगरीमधील अकादमी पुरस्कार (ऑस्कर) मिळाला होता. ऑस्कर जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. 1929 मध्ये कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. 1940 च्या दरम्यान त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्यांनी गाईड आणि वक्त यांसारख्या आयकॉनिक चित्रपटांचे त्यांनी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. 2020 मध्ये त्यांचे निधन झाले.
सत्यजित रे (Satyajit Ray)
सत्यजित रे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांना 1992 मध्ये ऑस्कर सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑस्कर सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्कार जिंकणारे ते भारतात पहिले फिल्ममेकर होते. पाथर पांचाली (1955), अपराजितो (1956), अपूर संसार (1959), द म्युझिक रुम (1958), चारुलता (1964) आणि द चेस प्लेयर्स (1977) हे त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीने बघतात.
रेसुल पुकुट्टी (Resul Pookutty)
2008 मध्ये रिलीज झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रेसुल पुकुट्टी यांना सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील अनेक चित्रपटांचे साऊंड मिक्सिंग केलं आहे.
ए.आर. रहमान (AR Rahman)
ए.आर. रहमान हा केवळ संगीतकार नाही तर तो गायक, गीतकार आणि निर्माता देखील आहे. 2009 मध्ये ए.आर. रहमानने दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले.
गुलजार (Gulzar)
81 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गुलजार यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांना स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जय हो या गाण्यासाठी बेस्ट ओरिजनल कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एम.एम किरवाणी (M. M. Keeravani) आणि चंद्रबोस (Chadrabose)
95 व्या अकादमी पुरस्कार (95th Academy Awards) सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्यासाठी एम.एम किरवाणी आणि चंद्रबोस यांना 'ओरिजनल सॉन्ग' या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला.
गुनीत मोगा आणि कार्तिकी गोन्साल्विस
'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा (Best Documentary Short Film) पुरस्कार पटकावला आहे. गुनीत मोगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
संबंधित बातम्या