Oscar Awards 2023:  ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावला आहे. तर सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार हा भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीनं पटकावला. जगभरातून ऑस्कर विजेत्यांचे कौतुक केलं जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्वीट शेअर करुन आरआरआर आणि द एलिफंट विस्परर्स या टीम्सचं कौतुक केलं आहे. 


आरआरआर चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहिल, असं हे गाणं आहे. एम एम किरावाणी, चंद्रबोस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारताला आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे.'






तर दुसऱ्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदींनी 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीच्या टीमचं अभिनंदन केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'द एलिफंट विस्परर्स' च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे महत्त्व अधोरेखित केले.'






'द एलिफंट विस्परर्स' हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. गुनीत मोगाने द एलिफंट विस्परर्स (The Elephant Whisperers) या माहितीपटाची निर्मिती केली असून कार्तिकी गोन्साल्विसने या माहितीपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Oscar Awards 2023: भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी मुसंडी; RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर अवॉर्ड