Ruchismita Guru: काही दिवसांपूर्वी  भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) आत्महत्या केली. आता आणखी एका अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्री रुचिस्मिता गुरुचा (Ruchismita Guru) संशयास्पद मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रुचिस्मिता गुरू तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळली. 


मामाच्या घरी राहात होती रुचिस्मिता 


अभिनेत्री रुचिस्मिता गुरू ही मूळची बालंगीर (balngir) शहरातील तळपलीपाडा येथील रहिवासी होती. ती सुदापाडा येथे मामाच्या घरी राहात होती.  26 मार्च 2023 (रविवार) रोजी रात्री रुचिस्मिता ही तिच्या नातेवाईकाच्या घरी मृतावस्थेत आढळली. पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भीमा भोई वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. 


रुचिस्मिताचा आईसोबत झाला होता वाद


एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुचिस्मिताच्या आईने सांगितलं की, तिचे आणि रुचिस्मिताचे बटाट्याचा पराठा बनवण्यावरून भांडण झाले होते. रुचिस्मिताच्या आईने रुचिस्मिताला 8 वाजता पराठा बनवण्यास सांगितला होता. पण रुचिस्मितानं तिच्या आईला सांगितलं की, ती 10 वाजता पराठा बनवेल. या विषयावरुन दोघींमध्ये वाद झाला होता. त्यांच्या भांडणानंतर काही वेळेनं रुचिस्मिता मृतावस्थेत आढळली.  रुचिस्मितानं आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 


रुचिस्मिता गुरूने अनेक अल्बममध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच रुचिस्मिताला गाण्याची देखील आवड होती. रुचिस्मिता गुरूने अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केले. रुचिस्मिता गुरू ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह होती. रुचिस्मिता ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. 






अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्या आत्महत्येचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली. आकांक्षाने बनारस येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली.आकांक्षाला लहानपणापासूनच मॉडेलिंग, डान्स आणि अभिनयाची आवड होती. पण आपल्या लेकीने आयपीएस अधिकारी व्हावं, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं.    


इतर महत्वाच्या बातम्या:


Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य; आयपीएस अधिकारी होण्याचं वडिलांचं स्वप्न अपूर्णच