Ghar Banduk Biryani: घर बंदूक बिरयानी (Ghar Banduk Biryani) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाची टीम पंढरपुरात (Pandharpur) गेली होती. यावेळी या चित्रपटाच्या टीमचे जंगी स्वागत करण्यात आले. नागराज मंजुळे (Nagraj Manjule), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), आकाश ठोसर (Akash Thosar), सायली पाटील (Sayli Patil) यांनी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर या टीमनं चित्रपटाचं प्रमोशन केलं. यावेळी नागराज मंजुळेनं एबीपी माझासोबत संवाद साधला. नागराजनं काही प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. 


घर बंदूक बिरयानी या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. आकाशला सैराट या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सैराटमध्ये आकाशनं परशा ही भूमिका साकारली होती. घर बंदूक बिरयानी या चित्रपटात परशा म्हणजेच आकाशनं काम केलं पण आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) या चित्रपटात का नाहीये? असा प्रश्न नागराजला विचारण्यात आला. या प्रश्नाला नागराजनं उत्तर दिलं, 'चित्रपटाची गरज पाहून कास्टिंग करण्यात आलं आहे.'


पुढे नागराजला प्रश्न विचारण्यात आला की, 'भविष्यात सैराटची टीम पुन्हा एकत्र येईल का?' नागराज म्हणाला, 'हो, येऊ शकते.' यावेळी नागराजनं त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल देखील सांगितलं. तो म्हणाला, त्याचा फ्रेम नावाचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट तीन-चार महिन्यात येईल. या चित्रपटात अमेय वाघ आणि मी काम करणार आहे.'



नागराजच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नागराजच्या झुंड, सैराट आणि फँड्री या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. 7 एप्रिल रोजी 'घर बंदूक बिरयानी'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटात नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  






इतर महत्वाच्या बातम्या:


Ghar Banduk Biryani Trailer: नागराज, सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर आकाश आणि सायलीचा रोमँटिक अंदाज;  'घर बंदूक बिरयानी' चा ट्रेलर पाहिलात?