Nupur Alankar : नुपुर अलंकार (Nupur Alankar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या 27 वर्षांपासून नुपुर मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. पण आता तिने मनोरंजनसृष्टीकडे पाठ फिरवली आहे. तसेच तिने संन्यासदेखील घेतला आहे.
नुपुरने फेब्रुवारी महिन्यात सर्व गोष्टींपासून संन्यास घेतला आहे. त्यामुळे आता ती तीर्थ यात्रेत सहभागी होण्यासोबतच गरजू मंडळींना मदतदेखील करताना दिसून येते. तसेच आता ती अनेक अध्यातमिक गोष्टींशी जोडली गेली आहे. ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत नुपुरने संन्यास घेल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
नुपुरने शक्तिमान, दीया और बाती हम आणि घर की लक्ष्मी बेटिंया सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. नुपुर सध्या मुंबई ते हिमाचल यात्रेत व्यस्त आहे. तसेच तिने तिचे मुंबईचे घर भाड्याने दिलं आहे. कोरोनाकाळात नुपुरला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.
नुपुर 2002 साली अभिनेता अलंकार श्रीवास्तवसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर नुपुरने संन्यास घेण्यासंदर्भात घरच्यांना सांगितले. त्यानंतर तिला घरच्यांनीदेखील पाठिंबा दिला. नुपुरला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यामुळे तिने संन्यास घेतला आहे.
संबंधित बातम्या