Somy Ali : अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) ही तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर म्हणजेच अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) सोशल मीडिया पोस्टमधून निशाणा साधत असते. सोमी अली ही सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्टनुसार, सलमान आणि तिचे नाते काही काळ टिकले पण नंतर त्यांचा ब्रेक-अप झाला. सोमी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. नुकतीच एक पोस्ट सोमीनं शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोमीनं सलमानच्या  'मैने प्यार किया' या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरला सोमीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 


सोमीची पोस्ट
सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन सोमीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'महिलांना मारहाण करणारा, फक्त मलाच नाही तर अनेक महिलांना यानं मारलं आहे. प्लिज त्याची पूजा करणं बंद करा. तो मानसिक दृष्ट्या आजारी आहे.' सोमीनं लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सलमानच्या नावाचा वापर केलेला नाही पण 'मैने प्यार किया' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सलमान दिसत आहे.सोमीनं या आधी देखील नाव न घेता सलमान खानबाबत पोस्ट शेअर केली आहे.   



नाव न घेता सोमीनं सलमानवर साधला होता निशाणा 
सोमी अलीनं याआधी देखील नाव न घेता सलमान खानबाबत पोस्ट शेअर केली होती. सोमी याआधी शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसत होते. पण या दोघांचा चेहरा दिसत नाहीत.  सोमीनं फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'बॉलीवूडचा हार्वे वेनस्टाईन! तुझं सत्य लोकांसमोर येईल. जसे ऐश्वर्या रायनं केले तसेच तू ज्या महिलांचे शोषण केले त्या एक दिवस बाहेर येतील आणि तुझं सत्य सांगतील.' पोस्टमध्ये सोमीनं उल्लेख केलेला बॉलीवूडचा हार्वे वेनस्टाईन हा नक्की कोण आहे? ते समजत नाही. काही नेटकऱ्यांनी कमेंट करून या  बॉलीवूडच्या हार्वे वेनस्टाईनला ओळखण्याचा देखील प्रयत्न केला. सोमी सोशल मीडियावरील तिच्या या पोस्टमध्ये सलमानच्या नावाचा उल्लेख करत नाही, पण सलमानच्या हॅशटॅगचा वापर तसेच सलमानच्या चित्रपटांचे पोस्टर ती शेअर करते, त्यामुळे नेटकरी अंदाज लावतात की, ती पोस्टमध्ये सलमानबाबतच बोलत आहे. 


सोमी अलीनं  'टारझन' आणि 'हम' या चित्रपटांमध्ये कामं केलं, सोमी ही 1990 मध्ये सलमानला डेट करत होती. पण काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.  1991 ते 1998 मध्ये सोमीनं चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर ती 1999 मध्ये अमेरिकेला गेली. 


वाचा इतर सविस्तर बातम्या: