RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला केला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमी केली. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी थिएटरमध्ये गेले, ज्यामुळे ‘RRR’च्या हिंदी डब व्हर्जनने 275 कोटींहून अधिक कलेक्शन जमवले आहे. चित्रपटगृहांनंतर आता चाहते OTT प्लॅटफॉर्मवर ‘RRR’ हिंदीत रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे.
‘आरआरआर’ चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नियोजित तारखेच्या जवळपास दोन आठवडे आधी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. अर्थात चाहत्यांना ‘आरआरआर’ हिंदीच्या ओटीटी रिलीजसाठी आता फक्त काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेटफ्लिक्सने याआधीच घोषणा केली होती की, चित्रपटाचे हिंदी व्हर्जन 2 जून रोजी स्ट्रीम केला जाईल. परंतु, गुरुवारी प्लॅटफॉर्मने माहिती दिली की, RRR हिंदी 2 जून ऐवजी 20 मे रोजी स्ट्रीम केला जाईल.
नेटफ्लिक्सची घोषणा
सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, ‘तुम्ही म्हणालात, त्यांना भेटण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही... आम्हीही वाट पाहू शकत नाही. RRR अवघ्या 24 तासांत तुमच्या भेटीला येत आहे.’
ठराविक वेळेच्या दोन आठवडे आधीच ‘आरआरआर’ प्रदर्शित करून नेटफ्लिक्सने चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. आज (20 मे) ‘आरआरआर’ अभिनेता ज्युनियर एनटीआर याचा वाढदिवस देखील आहे. याच निमित्ताने प्रेक्षकांना खास सरप्राईज मिळाले आहे. तर, Zee5 ने देखील आपल्या सदस्यांसाठी एक भेट दिली आहे. RRR हा चित्रपट 20 मे रोजी ZEE5वर इंग्रजी सबटायटल्ससह दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
बिग बजेट चित्रपट
तेलुगु पीरियड ड्रामा ‘RRR’ ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट 25 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला.‘RRR’ हा खर्चाच्या दृष्टीने देखील मोठा चित्रपट आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनेकवेळा उशीर झाला होता, ज्यामुळे चित्रपटाच्या बजेटवर देखील वाईट परिणाम झाला. मात्र, एसएस राजामौली यांनी केवळ खर्चाची परतफेड केली नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदार आणि भागीदाराने या चित्रपटातून पैसे कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही ‘RRR’ ची क्रेझ अद्याप थांबली नाहीये.
हेही वाचा :
- Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’
- Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान
- कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!