मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी आता 'फिटनेस गुरु'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'फिट स्टॉप' या आगामी टीव्ही शोमधून सनी लिओनी प्रेक्षकांना फिटनेसच्या टिप्स देणार आहे.

एमटीव्ही बीट्सवर 'फिट स्टॉप' हा फिटनेसवर आधारित शो प्रदर्शित होणारआहे. व्यायामाचे प्रकार, आसनांचे प्रकार यांसोबत आरोग्यासंदर्भातील टिप्स सनी लिओनी देताना या शोमधून दिसेल. व्यायाम आणि संगीत या दोन गोष्टींचा मिलाफही या शोमध्ये दिसून येईल.

फिटनेससंदर्भात बोलताना सनी लिओनी म्हणते, शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला फिट राहणं महत्त्वाचं आहे.

"कमी कालावधीत होणाऱ्या व्यायामांसाठी प्रत्येकानेच आपल्या दैनंदिन आयुष्यातून थोडा वेळ काढायला हवा. एमटीव्ही बीट्ससोबत 'फिट स्टॉप' लॉन्च केला असून, यातून संगीत ऐकत व्यायाम कसा करावा, हे दाखवून देईन.", असे सनी लिओनीने या नव्या कार्यक्रमासंदर्भात बोलताना सांगितले.