Nora Fatehi : नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील आणि टॅलेंटेड डान्सिंग परफॉर्मर अभिनेत्री आहे. नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहे. मोठ्या संघर्षानंतर नोराने सिनेइंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नोरा आपला 32 वा वाढदिवस साजरा (Nora Fatehi Birthday) आहे. नोराच्या लव्ह लाईफबद्दल फार कमीजणांना माहिती असेल. एका मुलाखतीत नोराने आपल्या प्रेम प्रकरणावर भाष्य केले होते. एका अभिनेत्यासोबत आपले प्रेम होते. मात्र, त्याने दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडसाठी मला धोका दिला असल्याचा गौप्यस्फोट नोराने केला. या ब्रेकअपमुळे नोरा डिप्रेशनमध्ये गेली होती. 


नोरा फतेहीचं झालं ब्रेकअप 


'दिलबर' गर्ल नोरा फतेही ही एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. आपणही कोणाच्यातरी प्रेमात होतो पण माझा प्रियकर माझी फसवणूक करणारा निघाला असल्याचा गौप्यस्फोट नोरा फतेहीने केला.याच काळात नोरा सिने इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत होती. त्यावेळी नोरा फतेही अंगद बेदीला डेट करत होती. अंगद आणि नोरा फतेहीच्या डेटिंगच्या बातम्याही त्या काळात चर्चेत होत्या. पण एके दिवशी अचानक त्यांचे मार्ग वेगळे झाले.


प्रेमात ब्रेकअप, नोरा डिप्रेशनमध्ये... 


'इन्व्हाईट ओन्ली टॉक शो'च्या एका वृत्तानुसार,अंगद बेदीचे नोरा फतेहीने नाव न घेता  तिचे नाते आणि ब्रेकअप सांगितले होते. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यातील या टप्प्याचा सामना करावा लागतो. ब्रेकअपनंतर खूप मोठ्या त्रासातून जावं लागले होते.


नोरा फतेही म्हणाली होती की ब्रेकअपचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला आणि ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. तिने जवळपास दोन महिने घरात स्वत:ला कोंडून घेतले होते. त्या काळात तिने कामावर जाणेही बंद केले होते. दोन महिने डिप्रेशनमध्ये राहिल्यानंतर नोरा फतेहीने अखेर यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नोराने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि तिला यश मिळू लागले. आज नोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा असून तिने काही रिएल्टी शोमध्ये परीक्षक म्हणूनदेखील काम केले आहे.






अंगद बेदीने 75 मुलींना केले होते डेट


नेहा धुपियाने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, तिचा पती अंगद बेदीने 75 मुलींना डेट केले होते. यानंतर नेहा जेव्हा त्याला भेटली तेव्हा लगेचच त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली. विवाहाच्या वेळी नेहाही अंगदपासून गरोदर राहिली होती.