No Entry 2: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan),अनिल कपूर  (Anil Kapoor) आणि फरदीन खान  (Fardeen Khan) यांचा 'नो एंट्री' (No Entry) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट 2005 मध्ये रिलीज झाला होता. आता या चित्रपटाच्या पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिक्वेलमध्ये सलमान, अनिल आणि फरदीन हे काम करणार नाहीयेत. नो एंट्री-2 या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? याबद्दल जाणून घेऊयात...


'नो एन्ट्री 2' चित्रपटात 'हे' कलाकार साकारणार भूमिका 


रिपोर्टनुसार, निर्माते लवकरच 'नो एन्ट्री 2' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी नुकतेच वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांना साइन केले आहे. या भागाचे दिग्दर्शनही अनीस बज्मी करणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केल्याचे बोलले जात आहे.


नो एंट्री-2 हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटातील कलाकार निश्चित झाले असले तरी सध्या अभिनेत्रींचा शोध सुरू आहे. नो एंट्री- 2 या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  या चित्रपटाची आता प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






'नो एन्ट्री' नं केली कोट्यवधींची कमाई


'नो एन्ट्री' हा चित्रपट सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने यावर्षी 74 कोटींहून अधिक कमाई केली होती.


'नो एन्ट्री' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती


26 ऑगस्ट 2005 रोजी 'नो एन्ट्री' रिलीज झाला होता. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान व्यतिरिक्त सेलिना जेटली, बिपाशा बसू, लारा दत्ता आणि ईशा देओल देखील दिसले होते.  या चित्रपटात प्रेक्षकांना कॉमेडीचा तडका बघायला मिळाला. आता या चित्रपटाच्या रिमेकची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Salman Khan: "सलमान भाईसमोर अभिषेक नावाचा माणूस कधीच जिंकू शकत नाही"; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या