Nivedita Ashok Saraf: अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. निवेदिता या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या निवेदिता या त्यांच्या सोशल मीडियावर एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून निवेदिता यांनी मलाड येथील एका मॉलमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
निवेदिता सराफ यांची पोस्ट
निवेदिता सराफ यांनी त्यांचा मॉलमधील एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'नमस्कार, मी infinity 2 मालाड मधील MAX स्टोअरमध्ये होते. तेथील कर्मचार्यांचा मला खूप वाईट अनुभव आला, तुम्ही काही खरेदी केले की नाही याची त्यांना पर्वा नव्हती तसेच ते मदत करायला तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने दुसऱ्या सेल्समनला सांगितले की, तिच्याकडे वेळ नाही आणि ती निघून गेली, जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला फोन केला. मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मला चांगली ट्रीटमेंट नको होती. पण मला चांगली ट्रीटमेंट हवी होती कारण मी एक सामान्य ग्राहक म्हणून तिथे गेले होते आणि त्या दुकानात पाऊल टाकणारी प्रत्येक व्यक्ती देखील तशीच जात असेल.'
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
निवेदिता यांनी शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हे अगदी खरे आहे,ग्राहक म्हणून प्रत्येकाला आदर दिला पाहिजे. '
निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सध्या मी स्वरा आणि ते दोघं या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत देखील काम करत आहेत. निवेदिता यांना इन्स्टाग्रामवर 132K फॉलोवर्स आहेत. 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील निवेदिता सराफ यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. निवेदिता सराफ यांनी बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, लपवा छपवी, आमच्या सरखे आम्हीच, बनवाबनवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :