Ashwini Bhave: 1988 मध्ये रिलीज झालेला 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हा असा चित्रपट आहे, जो कधीही बघितला तरी प्रेक्षक खळखळून हसतात. या चित्रपटाला रिलीज होऊन 35 वर्ष झाली आहेत. तरीही आजही अनेक लोक हा चित्रपट आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील डायलॉग्स, कलाकारांचा अभिनय या सर्वांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील लिंबू कलरची साडी, 'धनंजय माने इथेच राहतात का?' हे डायलॉग्स तर अनेकांना पाठ झाले आहेत. या चित्रपटामधील अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकतेच अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. अश्विनी भावे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचं कौतुक केलं. अश्विनी भावे यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा देखील एक फोटो शेअर केला. या फोटोला अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अश्विनी भावे यांनी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. मला हे नाटक खूप आवडलं. कॉमेडी क्विन निर्मितीनं खूप छान काम केलं आहे. तर अशोक सराफ यांची या नाटकातील एनर्जी आणि intensity पाहून मी भारावले.'
अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अश्विनी भावे यांच्या फोटोला कमेंट केली,'त्यांनी लिंबू कलरचा शर्ट घातला आहे.' निवेदिता सराफ यांच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या फोटोला एका युझरनं कमेंट केली, 'अश्विनी मॅडम यांची लिंबू कलरची साडी नाही पण अशोक मामा यांनी लिंबू कलर चा शर्ट घातलाय.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मिस्टर माने'
आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ashok Saraf: संपूर्ण सभागृह अशोक मामांसमोर नतमस्तक; पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा सन्मान