Nitin Desai Suicide: कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात केले जाणार आहे. थोड्याच वेळात मृतदेह कर्जत ND स्टुडिओ इथून जे जे हॉस्पिटलकडे नेण्यात येणार आहे.
मयूर ठोंबरे यांनी एबीपी माझाला सांगितले की, 'नितीन देसाई दादा यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 6 नंबरचे ग्राउंडच्या इथे त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा. अंत्यविधी तिथेच करण्यात येईल,आतमध्ये तयारी सुरू आहे.'
पुढे त्यांनी सांगितले की, 'एका कर्मचाऱ्याला त्यांनी निरोप दिला होता की, तू सकाळी 8.30 वाजता माझ्या ऑफिसमध्ये ये. तिथे एक व्हॉईस रेकॉर्डर असेल तो चेक कर. मी आणि तो कर्मचारी दोघे तिथे गेलो, तेव्हा आम्ही त्यांना लटकलेले बघितले.'
'मराठी पाऊल पडते पुढेच्या सेटवर त्यांनी आत्महत्या केली, तिथे खाली एक मोठा धनुष्यबाण काढण्यात आला होता, दादांनी एका रस्सीच्या मदतीने तो काढला, आणि त्याच्या बाणाचे टोक स्वतःकडे ठेवले. जिथे ते टोक होते तिथेच त्यांनी आत्महत्या केली होती.आम्ही तिथे गेलो हे बघितलं आणि सिक्युरिटी आणि पोलिसांना सांगितले मग पोलीस आले.' अंसंही मयूर ठोंबरे यांनी सांगितलं.
अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जितेंद्र जोशी,अमोल कोल्हे,अभिजीत पानसे यांनी शोक व्यक्त केला. तसेच विनोद तावडे ,सुप्रिया सुळे,नितीन देसाई, चित्रा वाघ या राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली आहे.
2005 मध्ये नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओची स्थापना केली. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: