Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. त्यांनी जीवन यात्रा संपवल्यामुळे मराठी हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. 'देवदास','लगान' अशा अनेक सुपरहिट सिनेमांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एखाद्या कलाकाराची इच्छा असते की त्याची कला सादर करताना कलेसोबतच त्याचा मृत्यू व्हावा. नितीन देसाई यांचा अंतदेखील असाच झाला आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, एनडी स्टुडिओमधील एका मोठ्या रंगमंचाच्या मध्यभागी नितीन देसाई यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. एनडी स्टुडिओमध्ये एक मोठा रंगमंच आहे. ज्याला बिग फ्लोर असे नाव आहे. या रंगमंचावर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली तसेच तिथेच ते दोरीला अटकलेले आढळले, असे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्या रंगमंचावर देसाई यांनी जगाचा सेट उभारला त्याच रंगमंचावर त्यांचा अंत होणं हे दुर्दैवी आहे.
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर उद्या (2 ऑगस्ट 2023) संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी आणि जावई परदेशात असतात. ते उद्या मुंबईत पोहोचणार आहेत. तोपर्यंत देसाईंचा मृतदेह मुलुंडमधील एका रुग्णालयाच्या शवाघरात ठेवण्यात येणार आहे.
आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट!
नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमुळे आसपासच्या गावांमध्ये रोजगार निर्माण झाला होता. गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती या सेटवर कामाला होता. पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून एन.डी. स्टुडिओत काम बंद होतं. नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. परिंदा, डॉन, माचिस, वजूद, जोधा अकबर, लगान, देवदास अशा अनेक सिनेमाचं कला दिग्दर्शन करणाख्या नितीन देसाई यांनी आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट घेतली आहे.
नितीन देसाई यांच्याबद्दल जाणून घ्या...
नितीन देसाई यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी हादरली आहे. 1942 साली'अ लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून नितीन देसाई यांनी खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. या सिनेमासह 'खामोशी' आणि 'देवसास' या सिनेमासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हम दिल दे चुके सनम, लगान आणि देवदास या सिनेमांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 100 मराठी सिनेमे काढण्याचं नितीन देसाई यांचं स्वप्न होतं. दिग्गज मराठी दिग्दर्शकांना एकत्र आणण्याची त्यांची योजना होती. 'हॅलो जयहिंद' या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे.
संबंधित बातम्या