Nitin Desai Suicide:  प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक कलाकारांनी  तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक किस्सा सांगितला होता.


नितीन देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितलं होतं,  '2003 मध्ये एका इव्हेंटमध्ये मी मोदीजींसाठी मोठ्या कमळाचा सेट उभारला होता. त्या कमळातून मोदीजींनी इव्हेंटमध्ये एन्ट्री झाली होती. एन्ट्री करण्याआधी मोदीजींनी मला बोलवलं होतं. ते मला म्हणाले, तुम्ही वेगळा स्टेज बनवला आहेस. या स्टेजवर मी कशी एन्ट्री करायची? मी त्यांना म्हणालो, तुम्हाला काहीही करायचं नाहीये, मी तुमच्यासाठी सर्वकाही केलं आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्टाईलमध्ये भाषण द्यायचं आहे.'


पढे नितीन देसाई यांनी सांगितलं होतं, 'तेव्हा मोदीजी मला म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत चला. त्यानंतर त्या 80 फुटाच्या कमळात आम्ही चालत गेलो. तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मी तुमच्यासाठी एक मॉन्टाज बनवला आहे. तुम्हाला इथे थांबाचं आहे. त्यानंतर हे कमळ ओपन होईल. तिथे त्यांना मी सोडलं आणि मी समोर जाऊन उभा राहिलो. त्यानंतर, स्टेजवर मोदीजी आले, ते कमळ ओपन झालं आणि त्यांना अडीच लाखांचा मॉब दिसला. त्यानंतर त्यांनी भाषण केलं. त्यावेळी मोदीजी बोलताना म्हणाले, यावेळी जे लोक आले आहेत, त्यामधील एक लाख लोक हे नरेंद्र मोदी यांना बघायला आले आहेत, तर दीड लाख लोक हे माझे मित्र नितीन देसाई यांनी उभारलेल्या स्टेजला बघायला आले आहेत. त्या इव्हेंटनंतर  मोदीजी आणि माझी भेट झाली नाही.'


पुढे नितीन देसाई हे म्हणाले,'त्यानंतर एकेदिवशी मला नरेंद्र मोदीजींचा फोन आला. ते मला म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा नितीन देसाई यांचा प्रणाम. तुम्ही विचार करत आहात का की, नरेंद्र मोदी मला का फोन करतील? यावर मी नरेंद्र मोदी यांना म्हणालो, सर मला विश्वास बसत नाहीये की, तुम्ही मला फोन केला आहे. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी जे काम केलं, त्याबद्दल मी दोन दिवस विचार केला. मला तुम्हाला भेटायचं आहे.'


नितीन देसाई यांनी पुढे सांगितलं, 'त्यांनी मला भेटण्यासाठी चार वेळा दिल्या. मी त्यांना 5.30 वाजता भेटलो. आमची 45 मिनिट चर्चा केली. त्यांना मी तेव्हा चार मिनिटांचं माझ्या स्टुडिओचं प्रेजेंटेशन दाखवलं होतं. त्यावेळी ते मला म्हणाले, मी तुला दिडशे नाही तर पाचशे एक्कर जमीन देतो तू गुजरातमध्ये येऊन स्टुडिओ बनव. पण मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की, पूर्ण फिल्म इंडस्ट्री इथे आहे आणि गुजरातमध्ये गर्मी आहे, तसेच गुजरातमध्ये लिकर चालत नाही, पण गोरे लोक जर शूटिंगला आले तर त्यांना दारु प्यायला लागते. माझं बोलणं ऐकल्यानंतर मोदीजी हसले होते आणि म्हणाले, तुला महाराष्ट्रातच स्टुडिओ बनवाचा आहे.'



वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Nitin Desai Suicide : नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टी हादरली; कलाकारांनी व्यक्त केला शोक