Nitin Desai ND Studio : नितीन देसाई (Nitin Desai) यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचं कला दिग्दर्शन करण्यासोबत एन. डी स्टुडिओची (ND Studio) निर्मितीदेखील केली आहे. नितीन देसाई यांनी मराठी-हिंदीसह हॉलिवूडच्या सिनेमांचे सेटही उभारले आहेत. रोमांच, गड-किल्ल्यांचे सेट्स, बंगले, राजवाडे असे डोळे दिपवणारे अनेक सिनेमांचे, कार्यक्रमांचे सेट्स नितीन देसाई यांनी त्यांच्या एन.डी स्टुडिओमध्ये उभारले आहेत. 


नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओबद्दल जाणून घ्या... (Nitin Desai ND Studio)


नितीन देसाई यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 2005 मध्ये एन.डी स्टुडिओची निर्मिती केली. अनेक सिनेमांचं आणि मालिकांचं शूटिंग या एन.डी. स्टुडिओमध्ये होत आहे. एन.डी स्टुडिओ हे नितीन देसाई यांचं दुसरं घरच होतं.एन.डी स्टुडिओचा परिसर 52 एकरचा होता. अनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही पद्धतीत या स्टुडिओमध्ये शूटिंग होत असे. 






नितीन देसाई यांनी 'एन.डी स्टुडिओ'मध्ये पहिल्यांदा 'मंगल पांडे' (Mangal Pandey) या सिनेमांचं कला दिग्दर्शन केलं. नितीन देसाई यांनी 'किक','जोधा अकबर','स्लमडॉग मिलियनेयर','बाजीराव मस्तानी','चक्रवर्ती सम्राट अशोक','प्रेम रतन धन पायो','ताजमहल','प्यार की ये एक कहानी' अशा अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्येच केलं आहे.


पर्यटकांच्या आवडीचा एन.डी स्टुडिओ...


एन.डी स्टुडिओ जगभरात लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या शहरांतील पर्यटक आणि सिनेप्रेमी मुंबईत आल्यावर न चुकता एन.डी स्टुडिओ पाहायला जात असे. मुंबईपासून काही तासांवर असलेला एन.डी स्टुडिओ जगभरातील पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. डोळ्यांची पारणे फेडणारा असा स्टुडिओ आहे. या स्टुडिओमधील सेट्स डोळे दिपवणारे आहेत. एन.डी स्टुडिओ खूपच आलिशान आहे. 


नितीन देसाई यांनी त्यांच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. यात आशुतोष गोवारिकर, विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांचा समावेश आहे. तसेच काही सिनेमांची निर्मितीही त्यांनी केली आहे. त्यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हम दिल दे चुके सनम, लगान आणि देवसास या सिनेमांसाठी नितीन देसाई यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.