Nita Mukesh Ambani Cultural Center India In Fashion Show : 'नीता अंबानी कल्चरल सेंटर'च्या (Nita Mukesh Ambani Cultural Center) उद्धाटनादरम्यान 'इंडिया इन फॅशन' (India In Fashion) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शोच्या माध्यमातून भारतीय फॅशनला जागतिक पातळीवर विशेष स्थान देण्यात आलं.
'इंडिया इन फॅशन' या फॅशन शोमध्ये जगभरातील 140 पेक्षा अधिक फॅशन संस्थानांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अलेक्जेंडर मैकक्कीन, बैलेंसियागा आर्काइव्स-पेरिस, शनेल, क्रिश्चियन डियोर कुटुअर, मेसन क्रिश्चियन लुबोटिन, कोरा गिन्सबर्ग एलएलसी, ड्रीस वैन नोटेन, एनरिको क्विन्टो आणि पाओलो तिनारेली कलेक्शन, फॅशन म्यूझियम बाथ, फ्रांचेस्का गैलोवे कलेक्शन - लंडन सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रॅंड्सने 'इंडिया इन फॅशन' या फॅशन शोमध्ये आपला सहभाग नोंदवला.
आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर दिसला भारतीय फॅशनचा प्रभाव
आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्ससह भारतीय फॅशन ब्रॅंड्सदेखील 'इंडिया इन फॅशन'मध्ये सहभागी झाले. यात फॅशन डिझायनर राहुल मिश्रा, रितु कुमार, अबू जानी संदीप खोसला, मनीष अरोडा, सब्यसाची, तरुण तहिलियानी, अनामिका खन्ना, अनीता डोंगरे, अनुराधा वकील यांनी उपस्थित असलेल्या मंडळींना भारतीय फॅशनची जादू दाखवली. एकंदरीत आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सवर भारतीय फॅशनचा प्रभाव दिसून आला.
भारतीयांनी युरोपियन फॅशन डिझायनर्सला दिली प्रेरणा
'इंडिया इन फॅशन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय फॅशन डिझायनर्सने युरोपियन फॅशन डिझायनर्सला प्रेरणा दिली आहे. यात शनेल, क्रिश्चियन डियोर आणि यीव्स सेंट लॉरेंट या ब्रॅंड्सचा समावेश आहे. यापुढे या तीन ब्रॅंड्सच्या फॅशनमध्ये भारतीय फॅशनची झलक पाहायला मिळेल.
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जगभरातील प्रमुख व्यक्तीमत्त्वांचा एकत्र येण्याचा तीन दिवसांचा उत्साची आता सांगता झाली आहे. 'इंडिया इन फॅशन' आणि 'संगम संगम' हे 3 एप्रिलपासून सर्वसामान्य लोकांसाठी खुलं होणार आहे. 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' हे देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र आहे. या कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासली जाणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार या मंचावर सादर होणार आहेत. यात नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या