Prabhu Deva Birthday: भारतातील टॉप डान्सर आणि कोरिओग्राफर असणाऱ्या प्रभूदेवाचा (Prabhu Deva) आज 50 वा वाढदिवस आहे. प्रभूदेवा हा केवळ डान्सर नाही तर अभिनेता आणि दिग्दर्शक देखील आहे. प्रभूदेवानं त्याच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रभूदेवा याची भारताचा मायकल जॅक्सन अशी ओळख आहे. तो भारताचा मायकल जॅक्सन कसा झाला? त्याबद्दल जाणून घेऊयात...
प्रभूदेवाचे (Prabhu Deva) वडील हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. 1994 मध्ये प्रभूदेवनं 'निधू' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून एन्ट्री केली. यानंतर प्रभूदेवाने एकामागून एक अनेक चित्रपटात काम केले केले. प्रभूदेवाची लोकप्रियता त्यावेळी वाढत होती. त्यावेळी तो एका चित्रपटाचे 50 लाख रुपये मानधन घेत होता. हळूहळू प्रभूदेवानं दिग्दर्शन क्षेत्रात देखील काम करण्यास सुरुवात केली. 'मुक्काला मुकाबला' (Muqabla) या गाण्यामध्ये प्रभूदेवाने डान्स केला. त्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
प्रभूदेवाला त्यांच्या नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. प्रभूदेवाला भारताचा मायकल जॅक्सन, असंही म्हटलं जातं. ABCD या चित्रपटामध्ये देखील प्रभूदेवानं काम केलं.
पत्नीपासून झाला विभक्त
प्रभूदेवानं 1995 मध्ये रामलथसोबत (Ramlath) लग्न केले. रामलथ ही देखील नृत्यांगना आणि कोरिओग्राफर होती. लग्नानंतर प्रभूदेवा आणि रामलथ यांना तीन मुले झाली, मात्र मोठा मुलगा बसवराजू सुंदरम याचे 2008 मध्ये निधन झाले त्यानंतर 3 वर्षांनी प्रभूदेवा रामलथपासून विभक्त झाला.
नयनतारासोबत जोडलं गेलं नाव
प्रभूदेवा हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी प्रभूदेवाचं नाव अभिनेत्री नयनतारासोबत (Nayanthara) जोडलं जात होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये देखील प्रभूदेवा आणि नयनतारा हे एकत्र दिसले होते.
प्रभूदेवाचा चाहता वर्ग मोठा आहे. तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रभूदेवा हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर त्याला 466K फॉलोवर्स आहेत. आज प्रभूदेवाच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या: