Aishwarya Rai Bachchan :  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सध्या बरीच चर्चा सुरु आहे. अनेक सोहळ्यांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकची वेगवेगळी उपस्थिती ही त्या चर्चांना दुजोरा देत असल्याचं चित्र आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. पण या सगळ्यावर अद्याप या दोघांकडूनही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाहीये. असं असलं तरीही त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत रावण या सिनेमासाठी निर्माता आणि दिग्दर्शक निखिल द्विवेंदू याने एकत्र काम केलं होतं. निखिलनेच एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यावर भाष्य केलं आहे. तसेच त्या दोघांना वेगळं झालेलं आम्हाला बघायचं नाही असं निखिलने म्हटलं आहे. 

'ते दोघे नवरा बायको आहेत...'

निखिलने नुकतीच फिल्मग्यानला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये निखिलने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यावर भाष्य केलंय. त्यामध्ये निखिलने म्हटलं की, 'स्क्रिनवर त्या दोघांची केमिस्ट्री ही उत्तम असते. ते कायमच त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये प्रोफेशनल असतात. ते लग्न झालेलं जोडपं आहे.. तर ते तसेच नवरा बायकोसारखेच राहणार.. आम्हालाही त्यांना कधी वेगळं झालेलं पाहायचं नाहीये. त्यांचं वैयक्तिक नात्यामुळे कधीच त्यांच्या कामावर परिणाम झालेला नाहीये. '

Continues below advertisement

ऐश्वर्याच्या वाढदिवसाला अभिषेक गैरहजर

अभिनेत्री ऐश्वर्या रायचा 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. तिचाय वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक किंवा बच्चन कुटुंबाने तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या नाहीत. अभिषेक बच्चन किंवा बच्चन कुटुंब ऐश्वर्यासोबत वाढदिवस साजरा करताना दिसले नाहीत. यावरुनच ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं. अभिषेकने ऐश्वर्याच्या वाढदिवसाला रोमँटिक पोस्टही केली नाही आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. यानंतर अभिषेक  आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली. पण, आता अभिषेक ऐश्वर्याच्या वाढदिवसाला नसण्यामागचं कारण समोर आलं आहे.

'या' कारणामुळे अभिषेक गैरहजर

दुबईमध्ये 1 नोव्हेंबरला ऐश्वर्या राय बच्चनच्या 51 व्या वाढदिवसाच्या पार्टीला अभिषेक बच्चनच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देत अभिषेक बच्चनच्या गैरहजेरीचं कारण समोर आले आहे. ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिषेक भोपाळमध्ये असल्याचं समोर आलं आहे. भोपाळमध्ये कौटुंबिक प्रकरण निपटवण्यात व्यस्त होता. अभिषेकची आजी इंदिरा भादुरी म्हणजे जया बच्चन यांची आई यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ही बातमी वाचा : 

ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चन गैरहजर, बर्थडे पार्टी टाळण्याचं समोर आलं मोठं कारण