Ranveer Singh: बॉलीवूडचा प्रसिद्ध जोडपं रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लेकीचा स्वागत करत बारसही केलं. रणवीर आणि दीपिका आई-बाबा झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या एनर्जीने आणि अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून बाबा झाल्यापासून जिथे संधी मिळेल तिथे लेकीचं, दीपिकाच कौतुक करून आपल्या भावना शेअर करताना दिसतो. मुंबईत पार पडलेल्या नुकताच एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. तिथेही प्रेक्षक आणि मीडियाला संबोधित करताना बाप झाल्यानंतरचा आनंद त्यांने शेअर केला. एरवी व्यक्त होण्यासाठी इतके शब्द असतात पण बाप झाल्याचा आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. असं रणवीर म्हणाला. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या चिमुकल्या राजकुमारीच्यी नावाची घोषणा केली. रणवीर आणि दीपिकाने मुलीचं नाव दुआ ठेवलं आहे.
काय म्हणाला रणवीर सिंग?
मी सध्या बाबाच्या रोलमध्ये येऊन बरेच दिवस झाले आहेत. जो अमर्यादित आनंद मला सध्या मिळतोय यासाठी मी स्वतः ही उत्सुक आहे. मला जाणंद होतोय हे सांगण्यासाठी मला शब्द सापडले असते तर मलाही आनंद झाला असता. पण हा आनंद तुमच्याशी शेअर करण्यासाठी माझ्याकडे कुठल्याच भाषेत आता शब्द नाहीत. जेव्हा आपल्याला खूप दुःख झालेला असतं तेव्हा ते शेअर केलं की कमी होतं. आणि जेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो तोही वाटल्यानंतरच वाढतो. असं सांगत रणवीरने बाप झाल्याचा आनंद शेअर केला.
मम्मा दीपिकाच्या 'दुआ'ची पहिली झलक
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या बाळाची काळजी घेत मातृत्वाचा आनंद आहे. या वर्षी 8 सप्टेंबर 2024 ला दीपिकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षानंतर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले. यानंतर दीपिका घराबाहेर पडताना दिसत नाही. तिचे मीडिया अपीअरेंस कमी झाले आहेत. कारण, दीपिका सध्या तिचा पूर्ण वेळ बाळाची काळजी घेत आहे. पण, आता दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीपिका दोन महिन्यानंतर मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसली आहे.