Nick Jonas :  प्रियांका चोप्रा (Priyanaka Chopra) ही सध्या तिच्या इंटरनॅशल प्रोजेक्ट्समुळे बरीच चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तिचा नवरा निक जोनस (Nick Jonas) हा देखील त्याच्या कॉन्सर्टमुळे अनेकदा चर्चेत असतो. अनेक ठिकाणी निकचे कॉन्सर्ट्स होत असतात. नुकतच निक त्याच्या भावांबरोबर मॅक्सिकोमध्ये कॉन्सर्ट करणार होता. पण सध्या त्याला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्याचमुळे त्याच्यावर त्याचे सगळे शो रद्द करण्याची वेळ आली आहे. निकने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. 


निकने त्याच्या चाहत्यांची माफी मागत एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. तसेच यामध्ये त्याने त्याच्या कॉन्सर्टच्या नव्या तारखाही सांगितल्या आहेत. निकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची अवस्था फारच वाईट झालेली दिसतेय. या व्हिडिओमध्ये निकने सांगितलं आहे की, त्याला इन्फ्लुएंझा ए हा आजार झाला आहे. यामुळे निकला गाता येणार नाही, त्यामुळे त्याने त्याचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. 


निकने व्हिडिओमध्ये काय म्हटलं?


एक व्हिडिओ शेअर करत निकने म्हटलं की, , 'मित्रांनो, मी सर्वत्र पसरत असलेल्या भयंकर इन्फ्लूएंझा-ए व्हायरसशी लढत आहे. त्यामुळे सध्या मला गाणंही जमत नाहीये.  म्हणूनच मी मॅक्सिकोमधीलही शो करु शकणार नाही. पण हे शो ऑगस्टमध्ये पुन्हा शेड्युल्ड केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून निकला हा त्रास होत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. 


दिवसभर अंथरुणातच


पुढे त्याने म्हटलं की, 'मी काल दिवसभर बेडवरून उठू शकलो नाही. अंगदुखी, ताप, घसा खवखवणे आणि खूप खोकला आहे. स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याची माझ्यात क्षमता नाही. त्यामुळे मला माफ करा. तुम्ही लोक आम्हाला सपोर्ट करण्यासाठी खूप काही करता. मी परफॉर्म करू शकणार नाही याची मला खंत आहे. पण मला लवकर बरे व्हायचे आहे.


दरम्यान मॅक्सिकोमधील जे कॉन्सर्ट रद्द झाले आहेत, जे ऑगस्ट महिन्यात होणार आहेत. ऑगस्ट 21 आणि 22 ला होणार असल्याचंही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या चाहत्यांनी त्याला लवकरच बरे होण्यासाठीही प्रार्थना करतायत. 






ही बातमी वाचा : 


Madhuri Dixit : 'ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस', एका सीनसाठी दिग्दर्शकाची माधुरीकडे मागणी अन्...