Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अर्थात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरीच्या अभिनय, नृत्य आणि सौंदर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 'धक धक गर्ल'ची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या करिअरमध्ये तिने 70 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. तसेच अनेक डान्सिंग रिएलिटी शोचंदेखील तिने परिक्षण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी दीक्षित चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. "ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस", अशी एका सीनसाठी दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी केली होती.
माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आपल्या दिलखेचक अदांनी तिने चाहत्यांना वेड लावलं आहे. हिंदी चित्रपटांसह मराठी मनोरंजनसृष्टीतही तिने आपला ठसा उमटवला आहे. 90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या माधुरीची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. आजच्या घडीला ती बॉलिवूडवर राज्य करताना दिसून येते.
...जेव्हा दिग्दर्शकाने माधुरीला ब्रा दाखवायला सांगितली
हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक टीनू आनंद यांनी नुकतचं रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की,"शनाख्त' हा चित्रपट कधीही रिलीज झाला नाही. पण या चित्रपटात माधुरी दीक्षित बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसून आली होती. शूटिंगच्या पहिल्या दिवशीच ब्लाउज काढून ब्रा दाखवायला हवी, अशी मागणी दिग्दर्शकाने माधुरीकडे केली होती. सुरुवातीला या सीनसाठी माधुरीने आपला होकार कळवला होता. पण नंतर तिने नकार दिला"
दिग्दर्शक टीनू आनंदचा मोठा खुलासा
दिग्दर्शक टीनू आनंद खुलासा करत म्हणाले,"माधुरीला मी संपूर्ण सीन समजावला होता. त्यावेळीच मी या सीनदरम्यान तिला ब्लाउज काढावा लागेल आणि ब्रा दाखवावी लागेल असं सांगितलं होतं. तिने ब्रा दाखवावी अशी त्या सीनचीच मागणी होती. त्यामुळे शूटिंगच्या पहिल्या दिवशीच मी हा सीन ठेवला होता. त्यावेळी अभिनेत्रीने या सीनसाठी आपला होकार कळवला होता.तसेच तिने तिच्या ब्राचं डिझाईन स्वत: करावं असं मी तिला सांगितलं होतं". माधुरीने सुरुवातीला होकार दिला. पण शूटिंगच्यावेळी तिने स्पष्ट नकार दिला. माधुरीने चित्रपटासाठी नकार दिल्याने दिग्दर्शकाने तिला बाहेरचा रस्ता दाखवला. पुढे या चित्रपटाचं काहीही झालं नाही".
संबंधित बातम्या