Star Kids Debut 2024 : बॉलिवूडसाठी (Bollywood) 2023 हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षात अनेक चांगले सिनेमे प्रदर्शित झाले. 2023 मध्ये अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan)  ते दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) यांची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदापर्यंत (Agastya Nanda) अनेकांचा यात समावेश आहे. या तिघांनी 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. आता 2024 मध्येही अनेक स्टारकिड्स पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.


शनाया कपूर (Shanaya Kapoor)


शनाया कपूर ही लोकप्रिय अभिनेता अनिल कपूर यांचा भाऊ संजय कपूर यांची मुलगी आहे. सौंदर्य आणि स्टाइलिंगमुळे शनाया अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावरदेखील ती चांगलीच लोकप्रिय आहे. शनाया 2024 मध्ये 'वृषभ' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करू शकते. 


जुनैद खान (Junaid Khan)


आमिर खानचा मुलगा जुनैद खान या वर्षात बॉक्स ऑफिसवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 'महाराजा' या सिनेमाच्या माध्यमातून तो सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जुनैदने आता या सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली आहे.


अमन देवगन (Aman Devgn)


अजय देवगनचा भाचा अमन देवगन रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. अद्याप अमनच्या डेब्यू सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. पण 2024 मध्येच त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


राशा टंडन (Rasha Thadani)


बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांची लेक राशा टंडन अनेकदा आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी राशी सज्ज आहे. 


इब्राहिम अली खान (Imbrahim Ali Khan)


सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा लाडका लेक इब्राहिम अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सैफ आणि अमृता यांची लेक सारा अली खान हिंदी सिनेसृष्टी गाजवत आहेच. अशातच आता इब्राहिमदेखील रुपेरी पडदा गाजवणार आहे.


अहान पांडे (Ahaan Panday)


चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेचा डेब्यू यशस्वी झाला आहे. अल्पावधीतच अनन्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. अनेक हिट सिनेमांचा ती भाग आहे. आता चंकी पांडे यांचा भाचा अहान पांडे सिनेसृष्टी गाजवणार आहे. याच वर्षात त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 


संबंधित बातम्या


New Year 2024 : 'डियर जिंदगी' ते 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'; नव्या वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे नक्की पाहा