New poster of Jersey : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) बहुप्रतिक्षित 'जर्सी' (Jersey) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. 'कबीर सिंह' नंतर शाहिद 'जर्सी' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'जर्सी' सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. या पोस्टरमध्ये सिनेमातील अनेक खास क्षण दाखवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये शाहिद चार वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. निश्चयी क्रिकेटर, प्रेमळ वडील, रोमॅंटिक नवरा आणि एक उत्तम माणूस असे शाहिदचे चार वेगवेगळे लूक या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहेत.





शाहिद कपूरच्या क्रिकेटसाठीच्या संघर्षावर 'जर्सी' सिनेमा भाष्य करणारा आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर 'जर्सी' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. जर्सी हा सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 


संबंधित बातम्या


Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित


Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha