मुंबई: गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रालाच 'याड लावलं' होतं. या चित्रपटातील 'झिंगाट' या गाण्यावर केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर बॉलिवूडचे कलाकारही थिरकले होते. त्यामुळे अजय-अतुल या जोडगोळीनी ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.

 

गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित 'जाऊ द्या ना बाळासाहेब' या चित्रपटात अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले 'डॉल्बीवाल्या' हे गाणे नुकतेच यूट्यूबवर पोस्ट करण्यात आले आहे. या गाण्याला आवाज नागेश मोरवेकर यांनी दिला आहे. यूट्यूबवर सध्या या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

 

गिरीश कुलकर्णी यांच्या या चित्रपटात गिरिश कुलकर्णी, वैभव देशपांडे, सई ताम्हणकर, मनवा नाईक, भाऊ कदम, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी आदी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

व्हिडीओ पाहा: