Bahubali: Before The Beginning : बाहुबली: द बिगिनिंग' (Bahubali: Before The Beginning) सिनेमा नेटफ्लिक्सने न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्मात्यांना 150 कोटींचा फटका बसला आहे. एसएस राजामौलींच्या  (SS Rajamouli) 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन' सिनेमांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नेटफ्लिक्सने एसएस राजामौलींसह 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' या फ्रेंचायझीच्या प्रीक्वलची घोषणा केली होती. 


'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' मध्ये बाहुबलीच्या आईची कथा वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे दिग्दर्शन करणारे देवा कट्टा या प्रोजेक्टमधून बाहेर पडले. ते ठरवत असलेल्या काही गोष्टी निर्मात्यांना पटत नसल्याचे म्हटले जाते. त्यातच मुख्य भूमिका साकारणारी मृणाल ठाकूरदेखील या प्रोजेक्टमधून बाहेर पडली. 


दरम्यान देवा कट्टा यांनी प्री प्रोडक्शनसाठी 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर सेट तयार केले जात होते. 6 महिन्यांच्या कालावधीत या भव्य सेटवर शूटिंग सुरू होते. यावर दीर्घकाळ काम केल्यानंतर निर्मात्यांनी नवीन कलाकारांना घेऊन पुन्हा नव्याने सर्व शूट करण्याचा निर्णय घेतला. कुणाल देशमुख आणि रिभू दासगुप्ता या नवीन दिग्दर्शकांसह निर्मात्यांनी सीरिजमध्ये सुधारणा केली.


मात्र आता या प्रकल्पाचे काम पुन्हा ठप्प झाल्याची चर्चा सुरू आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, प्री-प्रॉडक्शन स्तरावर केलेले काम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या दृष्टीकोनानुसार होत नाही. बाहुबली हा आजच्या काळात एक पंथ आहे. त्यामुळे निर्मात्यांना प्रतिष्ठित दर्जा असलेल्या एखाद्या गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 150 कोटी रुपये खर्च करून टीमने 200 कोटी रुपये गुंतवण्याऐवजी शूटिंगपूर्वीच या प्रोजेक्टचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.


संबंधित बातम्या


सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन


Padma Awards : 'हा पुरस्कार मी माझ्या देशाला समर्पित करतो', डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची प्रतिक्रिया; सोनू निगम म्हणाला...


Republic Day 2022 : Amitabh Bachchan यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनोख्या शुभेच्छा; दाढी रंगली तिरंग्याच्या रंगात


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha