Netflix March Release 2023: नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी (OTT) प्लेटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि (Web Series) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. आता मार्च महिन्यामध्ये नेटफ्लिक्सवर काही खास चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. यामध्ये यामी गौतम (Yami Gautam) आणि सनी कौशल (Sunny Kaushal) यांच्या चोर निकल के भागा आणि राणा दग्गुबातीच्या (Rana Daggubati) राणा नायडू या चित्रपटांचा समावेश आहे. जाणून घेऊयात मार्च महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज...
1 मार्च
लिटिल अँजल व्हॉल्यूम-2
इजी A
बिग डॅडी
चिट
टूनाइट युआर स्लिपिंग विथ मी
राँग साइड ऑफ द ट्रॅक्स सीझन-2
2 मार्च
मोनिक ऑलिव्हियर: ऍक्सेसरी टू एव्हिल
सेक्स/ लाइफ सीझन-2
फ्रेम! अ सिसिलियन मर्डर मिस्ट्री: सीझन 2
मसामीर काउंटी: सीझन 2
मार्च 3
नेक्स्ट इन फॅशन सीझन-2
लव्ह अॅट फर्स्ट किस
मार्च 4
डिव्होर्स अॅटर्नी शाइन, वीकली
मार्च 5
क्रिस रॉक ऑऊटरेज
मार्च 6
राइडली जोन्स सीझनः5
यामी गौतम आणि सनी कौशल यांचा चोर निकल के भागा हा चित्रपट 24 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
10 मार्चला राणा नायडू हा राणा दग्गुबातीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राणा नायडू या चित्रपटात सुरवीन चावला आणि सुशांत सिंह हे अभिनेते देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
24 मार्चला लव्ह इन ब्लाइंडचा चौथा सीझन देखील नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे. यासोबतच 21 मार्चला वी लॉस्ट अवर ह्युमन हा शो देखील नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे. तसेच मर्डर मिस्ट्री-2 ही अॅक्शन फिल्म 31 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सच्या या आगामी चित्रपट आणि सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: