Selfiee Box Office Collection Day 5: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सध्या त्याच्या सेल्फी (Selfiee) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी या चित्रपटाची निर्मिती 150 कोटींच्या बजेटमध्ये केली गेली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. पण हा चित्रपट पाच दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 20 कोटींचा टप्पा देखील गाठू शकला नाही. जाणून घेऊयात सेल्फी चित्रपटाचं पाच दिवसांचे कलेक्शन
रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी सेल्फी या चित्रपटाने 2.55 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3.80 आणि तिसऱ्या दिवशी 3.80 कोटींची कमाई या चित्रपटाने केली. तर चौथ्या दिवशी 1.3 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.10 कोटींची कमाई या चित्रपटाने केली. पाच दिवसांमध्ये सेल्फी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 12.70 कोटींची कमाई केली आहे.
'सेल्फी' हा मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा हिंदी रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 'ड्रायव्हिंग लायसन्स' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सेल्फी या चित्रपटामध्ये अक्षयसोबत इमरान हाश्मी, डायना पेंटी, नुसरत भरुचा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
अक्षयचे आगामी चित्रपट
अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. तर त्याचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचा 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
अक्षयचे 'हे' चित्रपट ठरले फ्लॉप
2022 मध्ये रिलीज झालेले अक्षयचे चित्रपट फ्लॉप ठरले. त्याच्या 'बच्चन बांडे', 'रक्षाबंधन', 'सम्राट पृथ्वीराज', 'रामसेतू' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आता त्याचा सेल्फी हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला आहे. अक्षयचे काही चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. याबद्दल एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितलं, "हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय असं नाही. माझ्या करिअरमधील जवळपास 16 चित्रपट फ्लॉप ठरले. असा काळ देखील होता, जेव्हा माझे आठ चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे." अक्षयचा आगामी चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: