Netflix India : भारतातील कथाकारांच्या पुढील पिढीला पाठिंबा देण्यासाठी 'नेटफ्लिक्स इंडिया'ने 'टेक टेन' या लघुपट कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतातील विविधांगी पार्श्वभूमी असलेल्या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना शोधणे आणि त्यांना पाठबळ देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या कार्यशाळेतील आणि स्पर्धेतील सिनेमे 'नेटफ्लिक्स'च्या 'इंडिया यूट्यूब चॅनल' वर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Continues below advertisement

10 चित्रपट निर्मात्यांना सर्जनशील उद्योगातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींच्या कार्यशाळेत उपस्थित राहण्याची आणि नंतर 10 हजार डॉलर्सच्या अर्थसहाय्याने लघुपट बनविण्याची संधी देण्यात येणार आहे.  भारतातील कोणत्याही भागातील इच्छुक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कथा मांडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. 

उत्तम कथा कोठूनही येऊ शकतात आणि उद्योगातील सर्वोत्तम व्यक्तींकडून प्रशिक्षण घेण्याची नवीन संधी निर्माण करता येते, हे या उपक्रमातून साध्य होणार आहे. 'टेक टेन' हा कथाकथनाचा आणि नावीन्यतेचा उत्सव आहे. सर्वसमावेशकता बाळगणे आणि कॅमेऱ्याच्या मागून व पुढून भारतातील विविध संस्कृतींचे प्रदर्शन मांडणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. 

Continues below advertisement

'टेक टेन' मधील निवडक स्पर्धकांना त्यांच्या शॉर्ट फिल्मची कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी तर मिळेलच, त्याशिवाय अभिषेक चौबे, हंसल मेहता, जुही चतुर्वेदी, नीरज घायवान व गुणीत मोंगा आदी पुरस्कार विजेत्या प्रतिभावंतांकडून लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि इतर अनेक गोष्टी शिकण्याची संधीदेखील मिळणार आहे. कथाकारांच्या पुढच्या पिढीला त्यांच्या कथांद्वारे स्वतःचा आवाज आणि दृष्टीकोन मांडण्यासाठी एक व्यासपीठ देऊन, अधिक समावेशक सर्जनशील उद्योग तयार करणे, हे 'टेक टेन'चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

संबंधित बातम्या

Karan Johar : मतदानाचा हक्क बजावा; राष्ट्रीय मतदार दिनाच्या आधी करण जोहरचं नागरिकांना आवाहन

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' सिनेमा ठरलेल्या वेळीच प्रदर्शित होणार

Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha