Bhool Bhulaiyaa 2 : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहेत. यात बॉलिवूडच्या कार्तिक आर्यनच्या आगामी 'भूल भुलैया 2' सिनेमाचादेखील समावेश असेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण भूल भुलैया 2' हा सिनेमा येत्या 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


कार्तिक आर्यनचा हा चित्रपट हॉरर-कॉमेडीचा दुहेरी संगम असेल. चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन आणि सायनी आहूजा हे प्रमुख भूमिकेत असतील. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. याआधी चित्रपटाचे तीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. कार्तिक, कियारा आणि तब्बू या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यादांच एकत्र काम करताना दिसून येणार आहेत.





कार्तिक आर्यन येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या चित्रपटावर गेले अनेक दिवस काम सुरू होते.  चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनचे काम लवकरच संपणार आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत असणार आहेत. 


संबंधित बातम्या


प्रेक्षकांनाच नाही तर, कलाकारांनाही ‘लोच्या झाला रे’ची उत्सुकता, चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित!


Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार


Major Postponed : 'मेजर' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha