Karan Johar : 25 जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. करण जोहर म्हणाला,"भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. तसेच मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यास विसरू नये".
का केला साजरा केला जातो 'राष्ट्रीय मतदार दिवस'?
सन 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त (25 जानेवारी 1950) याचं आयोजनं केलं जातं. देशातील मतदारांसाठी ही दिवस समर्पित असून मतदारांमध्ये जागरुकता तसेच निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या दिवसाचा उपयोग केला जातो.
भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही अधिकाराला धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी 25 जानेवारीला साजरा केला जातो.
संबंधित बातम्या
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' सिनेमा ठरलेल्या वेळीच प्रदर्शित होणार
प्रेक्षकांनाच नाही तर, कलाकारांनाही ‘लोच्या झाला रे’ची उत्सुकता, चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित!
Jai Bhim : सूर्याच्या 'जय भीम'ने नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकावले तीन पुरस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha