मुंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या 'बॅड न्यूज' (Bad Newz) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या तौबा तौबा गाण्याचे चाहत्यांना चांगलंच वेड लागलं आहे. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेता ॲमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलने तृप्ती डिमरीसोबतचा एक फोटो शेअर केला असून त्यामुळे इंटरनेटचा पार चांगलाच वाढला आहे.
विकी कौशल अन् तृप्तीचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स
चाहते 'बॅड न्यूज' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रोमँटिक-कॉमेडीसोबतच लव्ह ट्रायँगल पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 'तौबा तौबा' या चित्रपटाचे पहिलं गाणंही इंटरनेटवर ट्रेंडिंग आहे. या गाण्यात अभिनेत्री तृप्ती डिमरीने आपल्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावलं आहे. या गाण्याचील विकी कौशलच्या डान्सने तर वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. त्याने प्रत्येक बीटवर केलेल्या डान्स मूव्ह कॉपी करण्याचा बहुतेक जण प्रयत्न करताना दिसत आहे.
सिझलिंग-हॉट अंदाजातील फोटो समोर
तौबा तौबा गाण्याची डान्सने चाहत्यांच्या मनात घरं केलं आहे. अनेक जण 'तौबा तौबा' गाण्यावर रिल्स शेअर करत आहेत, त्यामुळे हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यानंतर आता विकीने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. विकी कौशलनने तृप्ती डिमरीसोबतचा एक हॉट फोटो शेअर करून इंटरनेटवर कल्ला केला आहे.
विकी-तृप्तीचे पूलमधील फोटो चर्चेत
विकी कौशलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो स्विमिंग पूलमध्ये तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. तृप्ती आणि विकी स्विमिंग पूलमध्ये एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेले दिसत आहेत. फोटोमध्ये, विकी शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे, तर तृप्ती निळ्या रंगाची बिकिनी परिधान करून खूप हॉट दिसत आहे. दोघांचा हा जबरदस्त रोमान्स पाहून चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. विकीने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.
पाहा विकी कौशलची इंस्टाग्राम पोस्ट
विकी-तृप्तीचा फोटो पाहताच नेटकऱ्यांनी आली कतरिनाची आठवण
विकी आणि तृप्तीचा रोमान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. यूजर्स दोघांची केमिस्ट्री पसंत करत आहेत आणि कतरिना कैफचे नाव घेऊन विकीचा पाय ओढतानाही दिसत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की 'भाई, कतरिना भाभीची जरा काळजी घ्या', तर दुसऱ्याने लिहिले, 'कतरिना ही गोष्ट कशी चालू शकते?' विकीची मजा घेताना एका यूजरने लिहिले की, 'कतरिना विचार करत असेल की तू घरी ये, मी तुला दाखवते.' यामध्ये प्राजक्ता कोळीच्या कमेंटनेही लक्ष वेधलं आहे. प्राजक्ता कोळीने या फोटोवर कमेंट करत ''SIR?🔥'' लिहिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :