Neena Gupta : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या चर्चेत आहे. नीना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. नीना या आपल्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता यूट्यूबर Ranveer Allahbadia ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तित आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
नीना गुप्ता यांचा जन्म 4 जून 1959 रोजी झाला. 64 वर्षीय नीना गुप्ता यांनी दिल्ली विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलं आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या नीना गुप्ता यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. नीना गुप्ता या क्रिकेटर Isaac Vivian Alexander Richards सोबत रिलेशनमध्ये होत्या. त्यांच्या लेकीचं नाव मसाबा गुप्ता आहे. आता रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या,"मी विवेक मेहरा यांना भेटले. त्यावेळी त्यांचं एक लग्न झालेलं होतं. तसेच त्यांना मुलंही होती. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आम्ही कपल थेरपी घेतली. पण संवाद साधणं खूप गरजेचं होतं. स्वत:सोबत संवाद साधणंही गरजेचं असतं. मी भिंतीसोबतही बोलू शकते. रिलेशनशिपचा सल्ला देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. मी कायमच चुकीच्या व्यक्तीला डेट केलं आहे".
मसाबा गुप्ताबद्दल बोलताना नीना म्हणाल्या,"माझ्याकडून चूक झाली. पण ती चूक मसाबाकडून होऊ नये, असं मला वाटत होतं. त्यामुळे मधु मंतेनासोबत जेव्हा मसाबा रिलेशनमध्ये होती तेव्हा तिची लिव्ह इनमध्ये राहण्याची इच्छा होती. पण या गोष्टीसाठी मी स्पष्ट नकार दिला आणि त्यांना लग्न करण्याचा संसार थाटण्याचा सल्ला दिला".
रणवीर इलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता पुढे म्हणाल्या,"फेमिनिझम वगैरे असं काही नसतं. पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान आहेत. आता यावर विचार करण्याची किंवा विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाही. त्यापैक्षा महिलांनी स्वत:साठी पैसे कमवण्याची गरज आहे. महिलांनी स्वत:ला दुय्यम समजण्याची गरज नाही. तुम्ही गृहिणी जरी असाल तरी ती खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. ज्या दिवशी पुरुष बाळाला जन्म देतील त्यादिवशी खऱ्या अर्थाने समानता येईल".
महिलांना पुरुषांची गरज
नीना गुप्ता म्हणाल्या,"महिलांना पुरुषांची जास्त गरज आहे. तरुणपणी मला सहा वाजताची फ्लाइट पकडायची होती. त्यासाठी मी चार वाजता घर सोडलं होतं. पण रस्त्यात खूप अंधार असल्यामुळे एक व्यक्ती माझा पाठलाग करू लागला आणि मी थेट घर गाठलं. त्यावेळी मला एका चांगल्या व्यक्तीची गरज होती".
नीना गुप्ता यांच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Neena Gupta Movies)
नीना गुप्ता लवकरच 'मेट्रो इन जिनों' या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात ते सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अली फजल आणि फातिमा सना शेखसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील. तसेच रानी मुखर्जी यांच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' आणि विशाल भारद्वाज यांच्या 'चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग वॅली' या सीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.
संबंधित बातम्या