Neena Gupta Viral Video: बॉलिवूडच्या (Bollywood Actress) अनेक गुणी अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवला. कधी प्रोफेशनल लाईफमुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नीना गुप्ता नेहमीच चर्चेत राहिल्या. असाच अभिनेत्रींपैकी एक नामांकीत अभिनेत्री म्हणजे, नीना गुप्ता (Neena Gupta). आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत होत्या नीना गुप्ता.
बॉलिवूडची नामांकीत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी नेहमीच ओळखल्या जातात. त्यांनी आजवर साकारलेल्या प्रत्येक पात्रानं चाहत्यांच्या मनावर खोल छाप सोडली आहे. त्यांचा अभिनय आणि सौंदर्य पाहून सगळेच प्रभावित झाले आहेत. सध्या नीना गुप्ता त्यांच्या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहेत. याच प्रोजेक्टमधील त्यांचा एक लूक प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या लूकच्या चर्चा सगळीकडे पसरल्या आहेत. हा व्हायरल होणारा फोटो म्हणजे, त्यांचा त्यांच्या आगामी प्रोजेक्टमधला लूक असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल होणाऱ्या लूकसाठी नीना गुप्ता यांनी टक्कल केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, त्यांच्या संपूर्ण चेहरा हिरवा पडला आहे. तर, त्यांचे डोळे सोनेरी रंगाचे दिसत आहेत. पंचायतमधल्या प्रधानजींच्या पत्नीची भूमिका साकारलेल्या नीना गुप्तांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. पण, त्यांचा हा लूक पाहून चाहते पुरते हादरुन गेले आहेत.
नीना गुप्ता यांचा 'गंजी चुडैल' लूक
दरम्यान, नुकताच यूट्यूब इंडिया इंस्टाग्राम पेजवर नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या खूप वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 65 वर्षीय नीना गुप्ता सोनेरी डोळे, हिरवा चेहरा आणि डोक्यावर टक्कल अशा लूकमध्ये दिसत आहेत. त्याच्या लूकनं युजर्सलाही आश्चर्यचकित झाले आहेत. नीना गुप्ता यांच्यासोबत ब्युटी आणि लाईफस्टाईल स्टार शिवशक्ती सचदेव, इशिता मंगल आणि शक्ती सिधवानी देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
नीना गुप्तांचा 'गंजी चुडैल' लूक पाहून चाहते हैराण
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची सुरुवात होते, एका व्हॉईस ओव्हरनं. ज्यामध्ये ऐकू येतं की, एक दिवस तीन युट्युबर्सना गंजी चुड़ैल किडनॅप करते. त्यानंतर नीना गुप्ता यांची दणक्यात एन्ट्री होते. नीना गुप्ता यांच्या डोक्यावर अजिबात केस नाही, चेहरा एकदम हिरवागार आणि डोळे सोनेरी... एन्ट्री करताच नीना गुप्ता म्हणतात, "मी थकलेय मीम्स बनवून. आता तुम्ही तिघं मला बेब बनवणार. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर व्हिडीओवर लाखो कमेंट्स आल्या आहेत.
नीना गुप्तांचा लूक पाहून युजर्स हादरले
नीना गुप्ता यांचा भयावह लूक वाहून युजर्स पुरते हादरले आहेत. त्यांनी एक व्हिडीओ शेअर कर क्लासी कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये "भूत आयकॉनिकपासून यूथ आयकॉनिकपर्यंत, ही आहे Gen Z ची चुडैल..." असं लिहिलं आहे. नीना गुप्तांच्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करुन व्यक्त होत आहेत. कोणी त्यांना क्युट चुडैल म्हणतंय, तर कुणी डरावनी गंजी डायन असं म्हणतंय. एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, "अरे प्रधान जी की बीवी का क्या हो गया.." तर आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, "खरंच प्रधानजींची पत्नी आहे का?".
महत्त्वाच्या इतर बातम्या :